पूजाचा प्रेमासाठी युवक चढला विजेचा खांबावर, नंतर पहा काय घडले.
सोशल मीडिया वरती कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम असतो , अनेक व्हिडिओज तुम्ही दररोज पाहत असाल, माञ हा व्हिडियो जास्तीत जास्त व्हायरल होत आहे. एका प्रेमविरानं चक्क पोल वर चढतच आपल्या प्रियसीला प्रेमाचं गाऱ्हाणं घातलं आहे.असं म्हणतात की प्रेमात आणि युद्धात सगळं मान्य असतं आणि यासाठी लोक देखील काहीही करण्याची तयारी दाखवतात.
मग अगदी स्वत:च्या प्राणाची पर्वा देखील करत नाहीत. तुम्ही असे प्रेमवेडे आशिक नक्कीच पाहिले असतील जे आपल्या प्रियकर किंवा प्रेयसीसाठी काहीही करण्याची तयारी दाखवतात.असाच एका प्रियकराचा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. जो पाहून तुमच्या काळजाचा ठोका चुकेल. पण या व्हिडीओमधील व्यक्तीला त्याचं काही नाही.
या व्हिडीओमधील व्यक्ती विजेच्या धोकादायक खांब्यावर चढला आणि तेथून पूजाला ‘आय लव्ह यू’ म्हणत आहे…. या प्रेम वेड्या आशिकनं हे सगळं करताना आपल्या जीवाची पर्वा अजिबातच केली नाही.या व्हायरल व्हिडीओमध्ये ही व्यक्ती ज्या खांब्यावर चढली आहे. तो खांबा खूप उंचावर आहे. शिवाय याच्या दोन्ही बाजूंनी धोकादायक तारा देखील आहेत.
तसेच या व्यक्तीच्या हातात मोबाईल दिसत आहे आणि ही व्यक्ती फोनवर ओरडून पूजाला सांगत आहे की त्याचं तिच्यावर प्रेम आहे. तसेच तो तिच्यासाठी काहीही करु शकतो. माञ असे स्टंट कधी कधी अंगलट येतात, या महा पराक्रमीवर कारवाई ही केली जाते