स्व अटल बिहारी वाजपेयी जयंती, मन कि बात कार्यक्रम, नाताळ एकत्रित साजरा.
पुणे प्रतिनिधी मंगेश गांधी
पुणे – ता. 25 – भारतरत्न स्व.अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती, मन कि बात, नाताळ सण एकत्रित साजरी करून एकात्मतेचा संदेश एकता प्रतिष्ठानने दिला. वर्षानुवर्षे सामाजिक उपक्रमांतर्गत कार्यक्रम घेत असताना समाजातील सर्वांगीण घटकाला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम आम्ही करत आहोत.
सर्वधर्म समभावाच्या आधारावर मानववतेचा झेंडा फडकवूया. सर्व धार्मियांचा आदर राखणे ही भारतीय संस्कृती आहे ती जपूया असे मत प्रतिष्ठान चे अध्यक्ष गणेश शेरला यांनी व्यक्त केले.
ख्रिश्चन सण नाताळच्या सर्वांना शुभेच्छा देऊन आणि अटलजी च्या प्रतिमा पुजन व पुष्प अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. भाजपा पर्वती मतदार संघाच्या वतीने मन की बात चाय के साथ कार्यक्रमाला प्रभागातील कष्टकरी वर्गासोबत, जेष्ठ नागरिकांनी हजेरी लावली.
देशाचे पंतप्रधान नरेद्रजी मोदी यांचे विचार व संदेश ऐकण्याची सोय दरवेळी प्रमाणे सुयोग सेंटर गिरीधर भवन चौक परिसरात करण्यात आली होती. यावेळी स्वाती शेरला, गणेश शेरला, संजय साठे, रमेश ईरला, अमोल अरकल, गणेश शिवशरण, विठ्ठल शिवपालक, निसार चाचा शेख, अब्दुल बागवान, जिमाल मोमिन, ईसाक भाई सय्यदै, पपु चिचवाडेकर, महेश सांळुखे आदी उपस्थित होते.