अहमदनगरचे सुपुत्र सागर साबळे यांची पहिल्याच प्रयत्नात दुय्यम उत्पादक निरीक्षक निवड.
शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देत अधिकारी झालेल्या साबळे यांना आ. लंके यांनी केले सन्मानित !
सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना शैक्षणिक व्यासपीठ मिळण्यासाठी काही महिन्यापूर्वी निघोज व कान्हूर पठार या ठिकाणी किमान दोन कोटी रुपयाची अभ्यासिका आमदार लंके यांच्या प्रयत्नातून उभी राहत आहे. त्याच बरोबर मतदार संघासह पर जिल्ह्यातीलही अनेक तरुण विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करणारे आ. लंके यांच्या प्रयत्नांना यश येत आहे. पारनेर तालुक्यातील रायताळे या छोट्याशा गावात एक सामान्य कुटुंबातील सागर साबळे या तरुणाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात यशस्वी पणे यश संपादीत करत दुय्यम उत्प- ादक निरीक्षक या पदावर अधिकारी म्हणून त्यांची निवड झाली आहे
पारनेर शुरांची वीरांची थोर – क्रांतिकारकांची व साधुसंतांच्या या भूमीत अनेक मौल्यवान हिरे पारनेर नगर मतदार संघाने आज पर्यंत देशाला दिले आहेत व त्यांनी मतदारसंघाचे नाव राज्यातच नव्हे तर देश विद- शात पोहोचवले आहे . माझ्या मतदार संघातील सर्वसामान्य कुटुंबातील एखादा सामान्य मुलगा आपल्या अंगी असणाऱ्या गुणवत्तेने इतिहास निर्माण करू शकतो हे सार्वभौम विचार करणारे व या गोरगरीब कुटुंबातील मुलांना एक शैक्षणिक व्यासपीठ निर्माण करून देण्यात नेहमी अग्रभागी असणारे पारनेर नगर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांचा नामोल्लेख करता येईल.
अधिकारी होण्यासाठी इंग्रजी माध्यमाची गरज असते हे खोटं ठरवणारे साबळे यांनी आपल्या शिक्षणाची सुरुवात रायताळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहिली ते चौथी शिक्षण पूर्ण केले व माध्यमिक शिक्षणही या छोट्याशा खेडेगावात पूर्ण केले . तदनंतर पारनेर येथील न्यू इंग्लिश स्कूल शाळेत अकरावी व बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले तर पदवीचा अभ्यासक्रम हा सावित्रीबाई फुले विद्यापीठात पूर्ण केला.
आपल्या गुणवत्तेच्या जोरावर शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देत असतानाच क्रीडा क्षेत्राची आवड असणाऱ्या सागर साबळे यांनी थलेटिक या मैदानी स्पर्धेमध्ये ही उल्लेखनीय कार्य केले . त्यांची तीन वेळेस राष्ट्रीय पातळीवर निवड झाली. राज्यपातळीवर त्यांना ३ वेळेस सुवर्ण तर दोन वेळेस रौप्य पदक मिळाले असून अष्टपैलू गुणवत्तेमुळे साबळे तालुक्यात कौतुकाचा व चर्चेचा विषय झाले आहेत.
या गुणवंत विद्यार्थी खेळाडू व अधिकारी हा टप्पा पार करणारे सागर साबळे यांचा पारनेर नगर विधानसभा मतदार संघाचे आमदार निलेश लंके यांनी आपल्या जनसंपर्क कार्यालयात त्यांना बोलावून घेत त्यांचे कौतुक करत त्यांचा येथोचित सन्मान केला. व आपल्या गुणव- चा उपयोग सर्वसामान्य जनतेसाठी करावा सर्वसामान्य गरीब कुटुंबातील तरुणांना आपण मार्गदर्शन करावे व आपल्या अधिकाराच्या माध्यमातून एक पारदर्शक सेवा राज्याला द्यावी असे मार्गदर्शन करत सागर साबळे यांना शुभेच्छा दिल्या.