” साईबाबा देव नाहीत” पहा कोणी केल हे वादग्रस्त विधान ?
संपूर्ण देशाचं श्रद्धास्थान म्हणून साईबाबा यांच्याकडे पाहिल जात, साईबाबा चे दर्शन घेण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक भाविक भक्त शिर्डी येथे येतात. अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी हे तीर्थस्थान जगप्रसिद्ध आहे. देशभरात मोठ्या प्रमाणात साईभक्त पसरलेले आहेत. साईभक्त आणि शिर्डी यांचे एक वेगळ भक्तिमय नात आहे, शिर्डीतील साईबाबां बद्दल एका मनातलं ओळखणाऱ्या कथित बाबांनी एक वादग्रस्त विधान केल आहे. तो बाबा म्हणतो कि ‘आमच्या धर्मातील शंकराचार्यांनी साईबाबांना देवाचं स्थान दिलं नाही. शंकराचार्यांचं म्हणणं मान्य करणं बंधनकारक आहे असं म्हणत धीरेंद्र शास्त्रींनी वादग्रस्त वक्तव्य केलं. धीरेंद्र शास्त्री जबलपूरमध्ये भागवतकथा कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी बागेश्वर सरकार दरबारात लोकांशी बोलत होते.
तेव्हा साईबाबांविषयी विचारलेल्या प्रश्नावर धीरेंद्र शास्त्रींनी साई बाबांना देव मानण्यास नकार दिला. आमच्या धर्मातील शंकराचार्यांनी साईबाबांना देवाचं स्थान दिलं नाही. शंकराचार्यांचं म्हणणं मान्य करणं बंधनकारक आहे. त्यांची प्रत्येक गोष्ट ही सनातनींचा धर्म आहे कारण ते धर्माचे पंतप्रधान आहेत. कोणीही संत असेल मग ते आमच्या धर्माचे असले तरी ते देव असू शकत नाहीत असं धीरेंद्र शास्त्री म्हणाले.धीरेंद्र शास्त्रींनी म्हटलं की, संत कोणीही असो, तुलसीदास असो, सूरदास असो, हे सगळे संत आहेत. कोणी महापुरुष, कोणी युगपुरुष, कोणी कल्पपुरुष आहेत पण यात देव कुणीही नाही.
आम्ही कुणाच्या भावनांना दुखावू शकत नाही पण सांगू शकतो की साई बाबा संत-फकीर असू शकतात, मात्र देव असू शकत नाहीत.आपल्या विधानावरून वादही सुरू होईल असेही धीरेंद्र शास्त्री म्हणाले. त्यांनी म्हटलं की, आता या वक्तव्यावरून लोक वाद करतील, पण सत्य बोलणं गरजेचं आहे. कोणीही कोल्ह्याची कातडी पांघरून सिंह बनू शकत नाही. शंकराचार्यानीही साईबाबांना देव मानण्यास नकार दिला होता. साई बाबांची पूजा कऱणं चुकीचं आहे. याशिवाय साईबाबांच्या मंदिराचाही शंकराचार्यांनी विरोध केला होता.
धीरेंद्र शास्त्री यांच्या या वादग्रस्त विधानावरती आता साई भक्तांच्या काय प्रतिक्रिया उमटतात हे पाहण महत्त्वाचे ठरेल, धीरेंद्र शास्त्री काही ना काही अशी विधान करत असतात, त्यामुळे ते नेहमी चर्चेत राहतात आणि वादाच्या भोवऱ्यात अडकलेले असतात