विद्यार्थ्यांचे मनोबल वाढावे म्हणून पळाशी येथील सामा. कार्यकर्ते भागवत कराळे यांनी घेतला पुढाकार.
विजय चौधरी-सोयगाव तालुका प्रतिनिधी
प्रजासत्ताक दिनी स्वखर्चाने राबविला आगळावेगळा उपक्रम.
सोयगाव प्रतिनिधी दि.२८ तालुक्यातील पळाशी येथे २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी येथील सामाजिक कार्यकर्ते भागवत कराळे यांनी स्वखर्चातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील विद्यार्थ्यांसाठी आगळावेगळा उपक्रम राबविला यावेळी त्यांनी गावातून प्रभातफेरी काढण्यासाठी चक्क स्वखर्चातून घोडा व म्युझिकल बँड उपलब्ध करून दिला.
यावेळी घोड्यावरून विद्यार्थीनीला भारतमातेचे कपडे परिधान करून व गावातून वाजत-गाजत देशभक्तीपर गीते गाऊन प्रभात फेरी काढण्यात आली या अनोख्या उपक्रमाने पळाशी गावात चैतन्यशील वातावरण यावेळी बघण्यास मिळाले सामाजिक कार्यकर्ते भागवत कराळे यांच्या या उपक्रमाचे गावातील ग्रामस्थांकडून तसेच पंचक्रोशीतील नागरिकांकडून कौतुक केले जात आहे
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अरुण पाटील,शिक्षिका उषा मोरे, यांनी योग्य मार्गदर्शन करून उपक्रम राबविला याठिकाणी गावातील सामाजिक कार्यकर्ते दिलीप लोखंडे,ग्रामपंचायत सरपंच अनिल चव्हाण,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य सुदाम दिवटे,देवानंद धुमाळ,सुपडू तोवर,शिवभाऊ कराळे, सोसायटी चेअरमन प्रभू तायडे यांच्यासह गावातील मोठया संख्येने ग्रामस्थांची उपस्थिती होती