पक्षांपासून उभ्या पिकाला वाचवण्यासाठी पहा या शेतकऱ्याने कसा जुगाड केलाय, व्हिडिओ होतोय व्हायरल.
आपण सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे जुगाड याआधी पाहिली असतील, पण हा जुगाड पाहिल्यानंतर तुम्हाला विश्वास बसणार नाही. हा जुगाड पिकाच्या संरक्षणासाठी केला आहे. आपण दैनंदिन व्यवहारांमध्ये पाहतो की, शेतकरी एवढी कष्ट करून पिक पिकवत असतो. पण बऱ्याच वेळेस या पिकांचे दाणे खाण्यासाठी पक्षी टपलेले असतात आणि कित्येक वेळा तर आपण हे पण ऐकले आहे की पक्षांचे थवेच थवे येऊन शेतकऱ्यांच्या हाती आलेल्या पिकाचे नुकसान करून जाते. पण या शेतकऱ्याचा जुगाड पाहून एक पक्षी देखील शेताकडे ढुंकून बघण्याचा विचार करणार नाही.
याआधी आपण शेतकरी पिकाचे संरक्षण करण्यासाठी शेताच्या मधोमध बुजगावणे उभा करायचा. या बुजगावण्याचा आकार हा हुबेहूब माणसासारखा असायचा. पण आता बुजवण्याचा म्हणावा असा प्रभाव पक्षांवर पडत नाही. आणि हे शेतकऱ्यांच्या लक्षात आले आहे, म्हणून शेतकरी वेगवेगळ्या प्रकारचे देशी जुगाड करत आहेत आणि असा जुगाड या शेतकऱ्याने केला आहे ज्यामुळे पक्षी शेताकडे येणार नाही.
गावाकडे राहणारे लोकांना पक्षी, गाई, हरीण, रानडुक्कर, म्हैस यासारख्या अनेक प्राण्यांकडून शेतातील पिकांचे नुकसान होऊ शकते असा धोका असतो. मोठ्या प्रमाणामध्ये रानटी प्राणी पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान करतात, शिवाय प्राण्यांपासून किंवा पक्षांपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी दिवसभर शेतात थांबणं शक्य नाही. आणि अशातच एका शेतकऱ्याने एक जुगाड केला आहे जे पक्षांना शेतापासून दूर ठेवण्यासाठी नक्कीच मदत करेल.
पक्षांनी शेतातील पिकाची नासाडी करू नये, नास धूस करू नये म्हणून शेतकऱ्याने एक अनोखी तंत्र वापरली आहे. हे उपकरण शेतामध्ये मोठमोठ्याने वाजत राहते आणि त्यामुळे पक्षी लांब पळून जातात. सोशल मीडियावर हा व्हिडिओ खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये शेताच्या मधोमध चिमण्यांना पळवण्यासाठी पंख्याच्या यंत्राचा वापर केला आहे. त्याच्या मोटारीला लोखंडी साखळी बांधलेली आहे. पंखा फिरू लागल्यावर रिकाम्या स्टीलच्या डब्यावर जोरात आढळते आणि त्यामुळे मोठा आवाज होतो. या आवाजामुळे पक्षी पिकाच्या जवळपास येत नाही. उलट जवळपास आलेले पक्षी देखील या आवाजाने उडून जातात.
शेतकऱ्याच्या एका युक्तीमुळे आता त्याच्या कुटुंबातील सदस्याला दिवसभर शेतामध्ये जाऊन उभा राहण्याची गरज भासणार नाही. शेतकऱ्याचे अनोखे जुगाडचा व्हिडिओ लाईफ हक्स नावाच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर झाला आहे. व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये लिहिला आहे की “ सोपा मार्ग “ सोशल मीडियावर या व्हिडिओची खूप चर्चा होत आहे आणि त्याच प्रमाणे लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील देत आहे.