अहमदनगर मधील “नवरा चालला बायको कडे नांदायला” पाहा नेमक काय आहे प्रकरण सविस्तर ?
अनेकदा पती-पत्नी वाद, अत्याचार या बातम्या तुम्ही ऐकल्या असतीलच. अनेक खटले हे निकाली निघतात, अनेक दावे कोर्टात चालतात. मात्र हा खटला, हा दावा अत्यंत निराळा पुरुषप्रधान म्हणून संबोधल्या जाणाऱ्या या संस्कृतीला चपराक ठरणारा निर्णय अहमदनगर न्यायालयाने दिला आहे. तुम्ही अनेक वेळा विवाह नंतर मुलगी सासरी मुलाच्या घरी नांदायला जाते अशी परंपरा, पद्धत अनेक वर्षांपासून चालत आली आहे.
मात्र या पद्धतीला छेद देणारा निकाल अहमदनगर न्यायालयाने जाहीर केला आहे. पतीने पत्नीच्या विरोधात तक्रार दाखल केली होती, यावर तक्रार पतीनेच पत्नीकडे राहायला जावं असं न्यायालयाने निकाल दिला. दिवाणी न्यायाधीश एस एस पारवे यांनी हा निकाल सर्वोच्च न्यायालयाचे विविध निकालांच्या आधारे दिला आहे. वकील भगवानकर कुंभार आणि शिवाजी सांगळे यांनी विवाहित महिलेच्या बाजूने न्यायालयात युक्तिवाद करत बाजू मांडली.
पती-पत्नी दोघेही उच्च विद्याविभूषित आहेत. एक जिल्हा परिषदेत शिक्षण विभागात तर दुसरे राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात नोकरीला आहे. या दोघांचा विवाह ऑगस्ट 2014 मध्ये झाला. विवाहाच्या दोन वर्षानंतर दोघांनाही मूल झालं, कालांतराने दोघांमध्ये वाद सुरू झाले. पत्नी नोकरीच्या ठिकाणी राहू लागली, त्यानंतर पतीने पत्नीला 2018 मध्ये परस्परसमतीने घटस्फोटासाठी नोटीस पाठवली.
यावरती न्यायालयाने वाद सुरू केला यावेळी पत्नीने वकिलामार्फत न्यायालयात बाजू मांडली. सासरंकडून होत असल्याच्या कथन केलं नोकरीच्या ठिकाणी पतीला बोलावलं. सुखाची मागणी केली आणि पतीने दाखल केलेल्या घटस्फोटाचा अर्ज ना मंजूर करण्याची मागणी केली. न्यायालयाने दोन्ही बाजूच्या परिस्थिती समजून घेतली सर्वोच्च न्यायालयाने अशा प्रकरणाची दिलेली निकालावरती आधारित पत्नीवर केलेले आरोप फेटाळले.
दोघे संबंध पूर्ण प्रस्थापित होण्यास पात्र असल्याच न्यायालयाने निकालात म्हटलं. त्यानुसार पतीने दोन महिन्याच्या आत वैविक संबंध पुनर्प्रस्थापित करावेत असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. वकीलकर कुंभ यांनी आल्यावर म्हटलं आहे की, लग्नानंतर मुलगी ही मुलाकडे म्हणजेच सासरी नांदायला जाते अशी परंपरा आहे. आधुनिक काळात तसेच समान नागरी कायद्याचा अवलंबून केल्यास कायद्यासमोर सर्व समान आहेत. त्यामुळे कोणतीही परंपरा कायद्यापेक्षा मोठी नाहीये वरिष्ठ दिवानी न्यायालयात दिलेला हा आदेश तसाच आहे. न्यायालयाची व्यक्ती स्वातंत्र्याचा महिलांच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा विचारांना बळ देणारा हा निकाल आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यामुळे आता हे पती आपल्या पत्नीकडे नांदायला जाणार आहेत.