” बहिणीच्या अंत्यविधीसाठी झालेल्या खर्चाचे पैसे दे ” अस म्हणून भावानेच आपल्या भावासोबत पहा काय केले.
औरंगाबाद मधून एक धक्कादायक बातमी समोर येते अंत्यविधी हा प्रत्येकाच्या आयुष्यामधला अत्यंत दुःखाचा क्षण असतो. या क्षणाची बरोबरी कुठल्याही गोष्टी सोबत होऊ शकत नाही, मात्र आपल्या बहिणीच्या अंत्यविधीसाठी हा भाऊ आला आणि त्यानं धक्कादायक कृत्य केल.
सिटी चौक पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली, ईश्वर गौडा असे आरोपीच नाव आहे त्याने आपल्या सख्या भावाचा खून करण्याचा प्रयत्न केला सनी गौडा असं जखमी झालेल्या त्या भावाचं नाव आहे . याप्रकरणी आरोपी वरती सिटी चौक पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
ईश्वर आणि सनी हे दोघे भाऊ असून काही दिवसापूर्वी त्यांच्या बहिणीचा मृत्यू झाला. अंत्यविधीसाठी ईश्वर ने तीन हजार रुपये खर्च केले, सनी भावाकडे गेला असता, ताईच्या अंत्यसंस्कारासाठी माझे तीन हजार रुपये खर्च झाले. “ते तू मला आत्ताच दे , असा तगदा लावला. मात्र माझ्याजवळ पैसे नाहीयेत मी एटीएम मधून काढून तुला देतो. असं सनी त्याला समजावून सांगत होता मात्र ईश्वर काही केल्या ऐकत नव्हता, रागाच्या भरात आरोपीने हातातील ब्लेडने सनीच्या मानेवरती वार केले या हल्ल्यात सनी जखमी झाला.
रक्ताच्या थारोळात सनी जागेवरतीच कोसळला त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयांमध्ये दाखल केला. सध्या सनी वरती उपचार सुरू आहेत तर विविध कलमान अंतर्गत ईश्वर वरती गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र आपल्या बहिणीच्या अंत्यविधीसाठीचा जो खर्च झाला आहे त्यावर या दोघांमध्ये वाद झाला. आणि हा वाद इतका विकोपाला गेला की, एका भावाने दुसऱ्या भावा वर खुनी हल्ला केला.