नगर पुणे महामार्ग भीषण अपघाताचा व्हिडीओ व्हायरल. भरधाव कंटेनरने कारला २ किमी फरफटत नेले.
अपघात म्हणजे अचानक आलेला मरण, अपघाताचे अनेक घटना दिवसेंदिवस घडत असतात. मात्र एवढा भीषण अपघात होऊन जीव वाचला हे महत्त्वाचं असतं. या बातमी मध्ये जो अपघात आहे तो तुमचं मन पिळवटून टाकणाऱ्या आहे, पाहताना असं वाटतं की या अपघातात कोणी वाचूच शकत नाही मात्र पुढे काय घडलं पहा.
अपघाताच्या अनेक बातम्या तुम्ही पाहिले असतील, ही थरकाप उडवणारी बातमी समोर येते शिक्रापूर या ठिकाणी अनेक अपघात घडत असतात मात्र हा अपघात अत्यंत भयानक आहे, तब्बल दोन किलोमीटर कंटेनरने कार ला फरफटत नेल आहे. पुण्याच्या शिक्रापुरात जीवाचा थरकाप उडणारा एक अपघात घडला. एका कारला तब्बल 2 km फरफट घेऊन जाणारा व्हिडिओ समोर येत आहे.
या कारमध्ये चार प्रवासी होते, चारही प्रवासी मात्र या घटनेमध्ये बलबल वाचले आहेत, यापैकी कुणालाही दुखापत झाली नाहीय, ‘देव तारी त्याला कोण मारी, याची प्रचिती या अपघातात आली.पुणे अहमदनगर महामार्गावर सातत्याने अपघात घडतात. रोज एक अपघात आणि यामध्ये अनेक जण मृत्यूमुखी पडल्याच्या गोष्टी घडतात. अत्यंत भयानक या अपघाताचे दृश्य सीसीटीव्ही मध्ये कैद झाले,
हाच व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. वेल्डिंगच्या ज्या पद्धतीने ठिणग्या उडतात, तशीच या कंटेनर कारला फरफटत घेऊन जाताना असा ठिणग्या उडत होत्या. पाहणाऱ्यांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झालं दिवसेंदिवस अपघात वाढत आहेत, या अपघातावर कधी नियंत्रण लागणार ? कारण कधी कधी अपघातामध्ये निष्पाप लोकांचे जीव जात आहेत.