तुम्ही मागील वर्षी वर्गणी दिली नाही अस म्हणाल्याचा राग मनात धरून पहा पिता – पुत्राने हे काय केले.
विजय चौधरी-सोयगाव तालुका प्रतिनिधी
गावात आगामी काळातील गणेश उत्सव ,रामदेव बाबा भंडारा, देवीची यात्रा हे उत्सव साजरे करण्यासाठी ग्रामपंचायतीकडून नियोजन सुरू होते यावेळी गाव बैठकीत पिता-पुत्रासह एकाने आमच्या मागील वर्षीच्या गोळा केलेल्या वर्गणीचा हिशोब द्या असा जाब तंटामुक्त अध्यक्षांना विचारला
तुम्ही मागील वर्षी वर्गणी दिली नसल्याचे बैठकीत सांगितल्याने त्याचा राग मनात धरून पिता-पुत्रांनी हातातील टोकदार वस्तूने तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षाच्या तोंडावर वार केले यामध्ये ते गंभीर जखमी झाल्याने बैठकीत गोंधळ उडाला ही घटना रविवारी नांदगाव तांडा येथे घडली याप्रकरणी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्षांनी सोयगाव पोलीस ठाण्यात तिघे पिता पुत्र आणि एका अज्ञाता विरुद्ध असे चार जनाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी नांदगाव तांडा येथे आगामी गणेशोत्सव रामदेव बाबा भंडारा आणि देवीची यात्रा हे आगामी उत्सव साजरे करण्यासाठी नियोजन व वर्गणी बैठक घेऊन यामध्ये निर्णय घेण्यात येतो त्यास यासाठी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष रमेश चव्हाण हे ग्रामस्थांना संवाद साधत असताना यातील बद्रीनाथ राठोड यांनी मागील वर्षीच्या वर्गणीचा हिशोब द्या असे म्हटले
मागील वर्षी तुम्ही वर्गणी दिली नसल्याचे रमेश चव्हाण यांनी सांगितल्यावर याचा मनात राग धरून बद्रीनाथ राठोड व किरण राठोड या पिता-पुत्रांनी हातातील टोकदार वस्तूने रमेश चव्हाण यांच्यावर हल्ला केला उर्वरित दोघांनी रमेश यास बेदम मारहाण केली यात रमेश चव्हाण गंभीर जखमी झाले असून तातडीने रमेश चव्हाण च्या फिरादीवरून पिता पुत्रासह चौगाव विरुद्ध सोयगाव पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे याप्रकरणी बद्रीनाथ राठोड किरण राठोड संदीप राठोड मनोज राठोड यांच्याविरुद्ध सोयगाव पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे