ऐकावं ते नवलच आता बटाट्याचे पीक घेण्यासाठी जमिनीची गरज नाही, पहा बातमी सविस्तर.
दिवसेंदिवस जगात आधुनिकता वाढत आहेत. सध्या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. तंत्रज्ञानाच्या जोरावर अनेक जण यशस्वी होत आहेत. शेती देखील या तंत्रज्ञानामध्ये मागे राहिली नाही, शेतीदेखील तंत्रज्ञानाच्या जोरावर ती नवनवीन प्रयोग केले जातात. अनेकांना शेती करायची असते, शेतीला आर्थिक साधन बनवायचं असतं, परंतु त्यांच्याकडे जमीन नसते किंवा पिकाला पोषक जमीन नसते. पण आता जमिनी शिवाय पण बटाटा या पिकाची लागवड करू शकता आणि भरघोस उत्पादन मिळवू शकता. तुम्ही म्हणाल की हे कसं शक्य आहे ? मातीशिवाय एखाद पीक कसं येऊ शकतं. ? पहा बातमी सविस्तर.
त्याबद्दल आपण जाणून घेऊयात, एरोपोनिक तंत्रज्ञानाचा शोध हरियाणातील कर्नाला या जिल्ह्यात असलेल्या बटाटा तंत्रज्ञान केंद्र लावला आहे. या तंत्राने लागवड केल्यास बटाट्याच्या उत्पादनात दहा पटीने वाढ होते. या तंत्राने शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना सरकारने मान्यता दिली आहे. या तंत्रज्ञानाने केलेली शेती शेतकऱ्यांसाठी अधिकच फायद्याची ठरू शकते.
शेतकऱ्यांना कमी खर्चात कमी जागेत बटाट्याचे उत्पादन घेता येऊ शकतं, हरियाणाच्या कर्नाला जिल्ह्यात असलेल्या सेंटर ऑफ बटाटा टेक्नॉलॉजी नुसार व उत्पादन क्षमता चार ते पाच पटीने वाढू शकते. तेव्हा हरियाणाचे नाही तर इतर राज्यातील शेतकऱ्यांनाही या तंत्रज्ञानाचा फायदा होणार आहे. तरी याच तंत्रज्ञानाचा वापर करून आपण पालेभाज्या, स्ट्रॉबेरी, काकडी, टोमॅटो औषधी वनस्पती यांचा देखील उत्पादन घेऊ शकतो. या तंत्रज्ञानाचा कसा उपयोग करायचा , याचा कसा फायदा कसा होतो. या अनुषंगाने प्रशिक्षण शिबिरे घेतली जातात.