“स्त्रीरोग तज्ञ कधीच हात पाय बघत नाही.” शिंदे गटातील मंत्र्याने जाहीर कार्यक्रमात केले वादग्रस्त विधान.
पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर अधिवेशनात घडलेले अनेक विधान संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय बनले. अत्यंत खेळत्या वातावरणात एकमेकांवरती टीका करत आणि विशेष म्हणजे कुठल्याही विकास कामांवर विशेष चर्चा न करता हे पावसाळी अधिवेशन संपन्न झाल. या अधिवेशनाबद्दल सर्वसामान्य माणसांची मोठ्या प्रमाणात नाराजगी होते. नव्याने स्थापन झालेल्या सरकार आणि त्यातील मंत्रिमंडळी यांच्याकडून फार मोठी अपेक्षा होती. मात्र तसं घडताना पाहायला मिळालं नाही, दुसरीकडे विरोधी पक्ष हा फक्त घोषणाबाजी करण्यात, टीकास्त्र करण्यातच मग्न पाहायला मिळाले.
नवीन सरकार आल्यापासून दिवसेंदिवस काही ना काही नवीन घडत आहे. यातच आता जळगाव येथे आयोजित एका कार्यक्रमात नवीन सरकार मधले मंत्री गुलाबराव पाटील यांनी वादग्रस्त असे वक्तव्य केले. ते म्हणतात की बालरोग तज्ञ, स्त्री रोग तज्ञ हे कधीच हात पाय बघत नाही, आणि हात पाय बघणारा कधीच स्त्रीरोग तज्ञ होऊ शकत नाही. आम्ही जनरल फिजिशियन आहोत, आमच्याकडे ज्याची बायको नांदत नाही तो पण येतो, आमच्या एकट डोकं असतं. आमच्याकडे वेगवेगळ्या समस्या असतात, आम्ही समजून घेऊन काम करतो असं यावेळी गुलाबराव पाटील म्हणाले.
दमदार भाषणासाठी गुलाबराव पाटील यांची ओळख आहे. मात्र जाहीर कार्यक्रमातच स्त्रीरोग तज्ञ डॉक्टरांवरती असं वादग्रस्त विधान केल्यामुळे विरोधकांकडून याबद्दलच्या प्रतिक्रिया येतीलच. मंत्री गुलाबराव पाटील यांचे विधान नेमका कोणत्या आशयाचं होतं. यावरती आता चर्चा होऊ लागल्या आहेत. कारण स्त्रीरोग तज्ञ कधीच हात पाय बघत नाहीत, हातपाय पाहणारा हा कधी स्त्रीरोग तज्ञ होऊ शकत नाही असं म्हणणं म्हणजे नेमकं काय ? वैद्यकीय क्षेत्रातील स्त्री रोग तज्ञ यांच्याही याबद्दल काय प्रतिक्रिया उमटतात हे पाहणं फार महत्त्वाचं ठरेल, कारण कोरोनाच्या काळात वैद्यकीय सेवा ही भक्कमपणे उभी होती आणि त्यामुळेच अनेकांचे जीव वाचले, त्यांच्याबद्दल एखादं असं चुकीचं विधान करणं हे कितपत योग्य आहे हाच सवाल आता उपस्थित राहतो.