” शिवसेनेत पुढे पुढे करतो काय….?” अस म्हणत पाहा शिवसैनिकासोबत काय केले…
गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातलं राजकारण अत्यंत विचित्र झाला आहे. याचा त्रास प्रत्येकाला होतोय बंडखोरी असेल महाविकास आघाडी सरकार पडणं असेल, नवीन सरकार स्थापन होणे असेल आणि यातच हिंदुत्वाचा नारा पिटवणारी शिवसेना असेल हिला लागणारी गळती असेल.
सुरुवातीच्या काळातील शिवसेनेमधून फक्त आमदार बंडखोरी करून बाहेर पडले होते. त्यानंतर खासदार देखील बाहेर पडू लागलेत आता पदाधिकारी, नगरसेवक महाराष्ट्रातील असे हे शिवसैनिक आहेत ते देखील शिंदे गटांमध्ये जात आहेत. त्यामुळे ठाकरे गट आणि शिंदे गट असे शिवसेनेचे दोन भाग झाले. या दुफळीचा फटका हा शिवसेनिकांना बसतोय. काही ठिकाणी समर्थन काही ठिकाणी विरोध काही ठिकाणी निदर्शन तर काही ठिकाणी आता हल्ले देखील होत आहेत.
कल्याणमध्ये असाच एक विचित्र प्रकार घडला शिवसैनिकावरती हल्ला झाल्याची बातमी समोर येते. कल्याण शहरातील शिवसेनेचे उपशहर प्रमुखांवरती तीक्ष्ण हत्याराने हल्ला केल्याची घटना घडली. हर्षद पालांडे यांच्यावरती हा हल्ला झालाय शिवसेनेत खूप पुढे पुढे करतो असं म्हणून अज्ञात हल्लेखोरांनी पालांडे यांच्यावरती हल्ला केला. शिंदे समर्थक महेश गायकवाड यांनी हा हल्ला केल्याचा आरोप पालांडे यांनी केला.
मात्र गायकवाड यांनी हे आरोप फेटाऊन लावले आहेत. पालांडे हे कल्याण पूर्व भागाच्या संतोषी माता रोड वरती गाडीने जात होते यावेळी तीन ते चार जणांनी गाडीतून बाहेर खेचत तीक्ष्ण हत्याराने हल्ला केला. तलवार, लोखंडी रोड यांन हा हल्ला केला. पालांडे यांच्या हाताला दुखापत झाली या हल्यात जखमी झाले असून खाजगी रुग्णालयात त्यांच्या वरती उपचार सुरु झाल्यानंतर कल्याण शहरात शिवसैनिक आणि शिंदे समर्थक यांच्या तणावाचं वातावरण निर्माण झालं. मात्र या प्रकरणांमध्ये पालांडे यांनी ज्यांचा ज्यांच्या वरती आरोप केले ते मात्र हे सर्व आरोप भेटून लावतात पोलीस या प्रकरणाचा योग्य ते तपास करतील आणि वेळेवरती आपण याला दात मागू असे देखील गायकवाड यांनी सांगितला