धक्कादायक: घरगुती गॅस सिलेंडर ‘ तब्बल’ एवढ्या रुपयाने महागल!
तुमच्या पोटात गोळा आणणारी ही आज ची महत्वाची बातमी,
राज्यात येणाऱ्या नव्या सरकारने पोट तिडकीने अगदी पहिलाच दिवशी इंधनाचे दर कमी करू आश्वस्त केलं होत. त्यामुळे अनेकांना ही नवीन सरकार काहीतरी बदल करेल सर्वसामान्यांची या महागाईपासून सुटका करेल असं वाटलं होतं मात्र तसं होताना दिसत नाहीये कारण की आज अत्यंत महत्त्वाची बातमी हातात आली आहे. ती इंधनाबद्दलची साहेब दैनंदिन जीवनात वापरले जाणारे इंधन घरामध्ये जेवण बनवण्यासाठी प्रत्येकाच्या घरात उपलब्ध असणारे इंधन म्हणजेच गॅस सिलेंडर ,एलपीजी गॅस सिलेंडर बद्दलची ही बातमी आहे सातत्याने या सिलेंडरच्या किमतींमध्ये काही ना काही प्रमाणात वाढ होत असते हीच एलपीजी सिलेंडरची किंमत आता वाढली आहे तब्बल पन्नास रुपयांची वाढ या एलपीजी सिलेंडर मध्ये झाली आहे त्यामुळे 1053 रुपयांना आता सिलेंडर मिळणार आहे.
कारण की तुमच्या घरात जो सिलेंडर आहे त्या किमतीमध्ये वाढ झाली आहे आज पासून देशांतर्गत 14 .2 किलो एलपीजी सिलेंडरच्या किमतीमध्ये ५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे या निर्णयानंतर राजधानी दिल्ली येथे घरगुती एलपीजी सिलेंडर साठी १०५३ रुपये मोजावे लागणार आहेत. तर पाच किलोच्या घरगुती सिलेंडरच्या दरात १८ रुपयांनी वाढ झाली या तर दुसरीकडे व्यावसायिक सिलेंडर 19 किलोचे या सिलेंडर मध्ये ८. 50 ने घट झालीये. त्यामुळे व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळालाय मात्र जे कुटुंब आहेत त्यांना मात्र या महागाईची मोठी झळ सहन करावी लागणार आहे.
घरगुती सिलेंडरच्या किमती वाढण्याची आणि व्यावसायिक सिलेंडरचे दर कमी होण्याची ही पहिली वेळ नाहीये एक तारखेला व्यावसायिक सिलेंडरला १९८ रुपयांची घट झाली होती. त्यानंतर नऊ रुपयांनी कपात देखील झाली. त्यामुळे व्यवसायिकांना मोठा दिलासा मिळाला नव्या दराने राजधानी दिल्लीमध्ये ९ किलोच्या सिलेंडर किंमत 2012 रुपये इतकी आहे. यापूर्वी 2022 रुपये इतकी होते मात्र आता नवीन दरांच्या घोषणेनंतर 14.२ किलोच्या सिलेंडर साठी राजधानी दिल्ली येथे 1053 रुपये कोलकत्ता या ठिकाणी १०७९ रुपये मुंबई या ठिकाणी 1052 रुपये चेन्नई या ठिकाणी १०६८ रुपये इतके मोजावे लागणार आहेत.
त्यामुळे प्रत्येक राज्यामध्ये हे दर वेगळे आहेत. मात्र आपल्या घरात जो सिलेंडर आपण वापरतो त्या सिलेंडरचे दर वाढलेले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना आता इंधन वापरणं अतिशय अवघड होणार आहे. उज्वला योजना अंतर्गत घराघरांमध्ये सिलेंडर पोहोचलं मात्र त्यानंतर अगदी महिन्यागणित या ठिकाणी गॅस सिलेंडरचे दर आहेत.त्यामुळे हा खर्च सर्वसामान्यांचे कुटुंबांचा वाढलेला आहे अगदी ग्रामीण भागातील कुटुंबातील शहरातील ज्यांच्या हातावरती बोट आहे, त्या कुटुंबातील त्यांना या गॅस सिलेंडरचे जे दर आहे ते न परवडणारे आहेत. सरकारने यावरती काहीतरी ठोस निर्णय घ्यावेत जे तेलाचे दर असतील जे इंधनांचे दर असतील बाहेर देशातून येणारे त्या इंधनांवरती टॅक्स कमी करून त्या ठिकाणी सर्वसामान्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा. सर्वसामान्यांना परवडेल अशा पद्धतीने सिलेंडरचे दर ठेवावेत. जेणेकरून जी जीवन आवश्यक गोष्ट आहे गॅसचा सिलेंडर त्याचे दर स्थिर राहिले तर खऱ्या अर्थाने सर्वसामान्य कुटुंबांना आपले जीवन जगताना जी आर्थिक चंचन जाणवत असते ती चणचन जाणवणार नाही याचा विचार एकदा सरकार न करणे महत्त्वाचे आहे