धक्कादायक : अखेर त्या आदिवासी मुलाचा मृत्यू झाला. पहा बातमी सविस्तर.
आदिवासी समाजातील मुलाने मुस्लिम मुली सोबत प्रेम विवाह केला होता, या दोघांनी परस्पर लग्न केले होते, कुटुंबीयांना हे मान्य नव्हते, घरी हे माहीत झाल्यानंतर त्या मुलीला तिच्या कुटुंबीयांनी पुणे इथे पाठवले. नातेवाईकांकडे, तसेच दीपक देखील आपल्या मित्राकडे कामानिम्मत गेला. दिपकचे अपहरण झाले असे त्यांच्या कुटुंबीयांनी म्हंट्ल आहे.
या घटनेला ९ दिवस झाले दिपकचा काहीच तपास लागला नाही, आ .राणे यांनी श्रीरामपूर येथे येऊन मोर्चा देखील घेतला. मोर्चा एक दिवस लोटत नाही तोच मुस्लिम मुलीशी लग्न केले म्हणून अपहरण करण्यात आलेल्या दीपक बर्डे बद्दल एक मोठी बातमी हाती आली. या आदिवासी युवकाचा ३१ ऑगस्टलाच आरोपींनी खून केल्याची माहिती तपासात उघड झाली आहे. आरोपींनी पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह गोदावरी नदीत फेकून दिला.
अटकेत असलेल्या आरोपींकडून तपासात ही माहिती पुढे आल्याचे श्रीरामपूरचे पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी सांगितले. या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिस आता पुरावे संकलित करीत असल्याचे असल्याचे सांगण्यात आले. या घटनेचा घटना क्रम कसा आहे आरोपींना काय शिक्षा होईल. यात अजून कोण कोण सुत्रधार आहे याचा सखोल तपास केला जाईल.
आता पर्यंत या प्रकरनात श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी मजून शेख, इम्रान अब्बास शेख, समीर अहमद शेख, अजित शेख यांना अटक केली. त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू होती. यामध्ये पोलिसांना आज महत्वाची माहिती मिळाली आहे. आरोपींनी ३१ ऑगस्ट रोजीच आरोपीला बेदम मारहाण केली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपींनी त्याचा मृतदेह गोदावरी नदीत फेकून दिला, अशी माहिती आरोपींकडून पोलिसांना मिळाली आहे.