धक्कादायक : जेवणात बुरशीच्या चपात्या, किड्यांची चन्याची डाळ, कामगारांच्या जीवाशी असा चालू खेळ.

शिंदे गटातील आमदार संतोष बांगर यांचा एक आक्रमक चेहरा समोर आलाय. सातत्याने दर्शन काम करताना बऱ्याचदा त्यांना पाहिला असेल. ते हिंगोली मतदारसंघात आमदार आहेत त्या ठिकाणचे ते लोकप्रिय आमदार म्हणून बहुचर्चित आहेत. आमदार संतोष बांगर अत्यंत भडकलेले दिसले. त्यांनी डायरेक्टर व्यवस्थापकाच्या थेट कानाखालीच लागावली नेमका असं झालं काय ते पाहू,
कामगार कल्याण मंडळाकडून असंघटित कामगारांसाठी मध्यान्य भोजन ही योजना सुरू करण्यात आली. त्यानंतर हिंगोली जिल्ह्यात एका कंपनीला कंत्राट मिळालं. संतोष बांगर यांनी तक्रारीनंतर थेट त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. तेव्हा त्यांची निदर्शनास आलं चपातीला बुरशी लागली, धान्याला कीड लागली, कांदे सडलेले आहेत त्यामुळे त्यांचा राग अनावर झाला.
कामगारांच्या जीवाशी खेळू नका असं म्हणत उपहारगृह व्यवस्थापकावरती त्यांनी आपला सर्व राग काढला. या व्यवस्थापकाच्या थेट कानाखाली लावली. हे असं होतच कसं कलेक्टरला फोन करा. आणि ताबडतोब या सगळ्या गोष्टी बंद करा असं ते म्हणाले. गावात टेम्पोच्या माध्यमातून गरीब संघटित कामगारांना जेवणाचे डबे पुरवले जातात. मात्र किचनची अवस्था पाहिली तर इथलं जेवण जनावरही खाणार नाहीत अशी स्थिती आहे.
लिंबाळा इथल्या किचनची पाहणी केली असता बांगर यांनी अधिकाऱ्यांची कान उघडणी केली. त्यासंदर्भात जिल्हा कामगार अधिकारी टी एस कराड यांना विचारला असता कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली गेली आहे अशी त्यांनी माहिती दिली. मात्र मीडिया सोबत बोलण्यास त्या अधिकाऱ्याने नकार दिला आहे. बांगर यांनी त्या मॅनेजरच्या कानाखाली का लगावले असा सवाल उपस्थित राहू शकतो मात्र कामगारांचे जीवाशी खेळ सुरू आहे आणि त्यामुळे आपल्याला चिड आली आणि त्यातूनच हा संतापजनक प्रकारे घडला.
सरकारने या कंपनीवरती तात्काळ कारवाई करून कठोर कारवाई केली पाहिजे. कारण गरीब कामगारांचे जीवाशी खेळणं त्यांची फसवणूक करणे ही अत्यंत चुकीचा आहे. अस त्यांनी म्हटलं कामगाराच्या जीवाशी खेळाल तर याद राखा असा दम देखील यावेळी आमदार संतोष बांगर यांनी दम भरला.