धक्कादायक : पोलीस मुख्यालयाच्या गेटवर पोलिस कर्मचाऱ्याचा खून, पहा बातमी सविस्तर.
कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावं यासाठी पोलीस दल 24 तास मेहनत करत. अनेक मोठे मोठे आव्हाने स्वीकारत कुख्यात गुन्हेगारांना जेरबंद देखील करतात. मात्र पोलीस दल सर्व ठिकाणी कायदा न सुव्यवस्था अबाधित ठेवत असताना गुन्हेगारांवरती वचक ठेवत असताना मात्र आपल्याच परिसरात अगदी पोलीस मुख्यालयामध्येच धक्कादायक गोष्टी घडतात. यवतमाळच्या पोलीस मुख्यालयात चक्राहून सोडणारी घटना घडली. पोलिसा मुख्यालयाच्या गेट वरती पोलीस कर्मचाऱ्यांचा खून करण्यात आला.
गुन्हा झाल्यानंतर किंवा गुन्हा घडल्यानंतर ज्या ठिकाणी शिक्षा केली जाते, ज्या ठिकाणी त्याला गुन्हेगार घोषित केलं जातं अशाच ठिकाणी जर गुन्हा घडत असेल तर सर्वसामान्य माणसांना नेमकं कोणाकडे पाहायचं, त्याचा रखवाला कोण असेल हा प्रश्न पुन्हा एकदा अधोरेखित झाला. खाकीचा आणि कायदा सुव्यवस्थेचा धाक समाजावर राहिला नाही का हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाल.
यवतमाळ मधील पोलीस मुख्यालयाच्या समोर हा प्रसंग घडत आहे. कुठेतरी अश्या घटना पाहून अस वाटत कि महाराष्ट्र राज्य हे बिहार सारख्या राज्याची बराबरी करायला लागले आहे. आजही महाराष्ट्र पोलीस हे नाव गुन्हेगारी कमी करण्यात नावाजले जाते, एकीकडे पोलिसांबाबत असा दाखला देत असताना जर त्याच्यासोबतच असा प्रसंग घडत असेल तर सामान्य जनतेने कोणाचा आधार घ्यायचा अश्या घटना घडवताना गुन्हेगारांना भीती वाटत नाही का ? असा हि प्रश्न निर्माण होत आहे.