धक्कादायक : असा अपघात होणे नाही; एकाच वेळेस अपघातात तब्बल ” एवढा ” जणांना गेला प्राण.

दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढताना आपण पाहत आहोतच गेल्या काही दिवसापासून नगर – पुणे रोड वर कित्येक अपघात झालेले आपल्या पर्यंत आले असेलच. तसेच काही उदगीर याठिकाणी घडले आहे. उदगीरहून चाकूरला एक एसटी महामंडळाची बस आणि तुळजापूरहून उदगीरकडे येणारी कार यांच्यामध्ये उदगीर-नळेगाव रस्त्यावरील हैबतपूर पाटीच्या पुढे भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील पाच जण जागीच ठार झाले आहेत. तर बसमधील जखमींना उदगीरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कारमधील मयत 5 जण उदगीर येथील एका खासगी रुग्णालयात कामाला होते.
उदगीर आगाराची बस चाकूरकडे रवाना झाली होती. दरम्यान, बस हैबतपूर पाटीच्या पुढे आल्यावर तुळजापूर येथून दर्शन घेऊन परत उदगीरकडे येणारी कार बसला समोरुन धडकली. हा अपघात इतका भीषणता एवढी होती की कारमधील असणारे पाचजण जागेवरच ठार झाले. तर बसमधील दहाजण जखमी झाले असून त्यांना उदगीर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी तेथील स्थानिकांनी धाव घेतली. तसंच घटनास्थळी उदगीर ग्रामीण पोलिसांनी तातडीने धाव घेत मदतकार्य केलं. सर्वांनी मिळून बचाव कार्यास प्रारंभ केला. काही जखमींना प्रथमोपचार दिले गेले. दरम्यान सद्यस्थितीत पाच जणांचा मृत्यू झाल्याचं समोर येत आहे. अद्याप मृतांची ओळख पटली नसून अपघातास्थळी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
मंगळवारी सकाळी 8 वाजताच्या सुमारास ही घटना घडली असल्याचं समोर येत आहे. उदगीर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाचही जणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलेले आहेत. तर, जखमींवर उपचार सुरू आहेत. रस्त्याने प्रवास करताना हा प्रवास किती घटक होता हे यावरून आपल्या लक्षात येईल. पण प्रवासादरम्यान या अश्या चुका जर आपण कोणाकडून होत असेल तर त्यापासून आपण वेळीच सावाथ होणे गरजेचे आहे.