कॉल रेकॉडींग तपासातून आलं धक्कादायक सत्य बाहेर, तीन मित्रांनी केल शिक्षकासोबत असे काही पहा सविस्तर.
सरकारी शाळेतील शिक्षकांच्या हत्याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली , शिक्षकांचा मृतदेह आढळून विहिरीत आढळून आला त्याचे नाव आदेश त्यागी असे होते. या शिक्षकाच्या मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. नोकरीच्या निमित्त त्यागी एकटेच गाजियाबाद या ठिकाणी राहत होते ते सरकारी शाळा येथे शिक्षक म्हणून काम करत होते, सहलीचा निमा खर्च उचलण्यास नकार दिला म्हणून आदेश त्यागी यांची हत्या करण्यात आली. विहिरीच्या ठिकाणी दुर्गंधी येत असल्याची माहिती एका व्यक्तीने पोलिसांना दिली,त्यानंतर हे प्रकरण समोर आलं..
पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली तर हा मृतदेह प्राथमिक शाळेतील शिक्षकाचा असल्याचे निष्पन्न झाल, पोलिसांनी त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. आदेश यांच्याशी पंधरा ते वीस दिवसापासून कुठलाही संपर्क झाला नव्हता अशी माहिती कुटुंबीयांनी दिली. त्यागी यांचा बुडून मृत्यू झाल्याचं तपासणी अहवालातून समोर आलं होत, त्यामुळे हे प्रकरण आत्महत्येचा असाव असं वाटलं. मात्र त्यांचे कॉल रेकॉर्ड तपासल्यानंतर वेगळीच माहिती समोर आली.
फोन स्वीच ऑफ होण्यापूर्वी आदेश आणि मित्रांनी कमीत कमी दहा वेळा संवाद साधला होता, ते तीन हि मित्र फरार होते अशी माहिती पोलिसांना मिळाली, पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं, त्यांना खाक्या दाखवल्यानंतर त्यांनीच हत्या केली हे कबुल केल, राजस्थानला बागडला फिरायला जायचे नियोजन आखलं मात्र निम्मा खर्चा आदेशाने करावा असं मित्रांनी ठरवलं होतं मात्र त्यांनी यास नकार दिला यातून त्यांचा वाद झाला हे प्रकरण हाणामारी पर्यंत पोहोचलं आणि यातूनच त्यांनी आदेशच्या डोक्यात दांडा मारून त्याला बेशुद्ध केल. आदेशचा मृत्यू झाला अस वाटलं होत त्यामुळे जंगलातील एका विहिरीत मृतदेह फेकून दिला, आता या प्रकरणाचा उलघडा झाला असून पोलीस कसून तपास करत आहेत.