नगर ब्रेकिंग ; शहरात रात्री नेमक काय घडल ? घरांची व गाड्याची कोणी केली तोडफोड
शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे सत्र वाढत आहे, हानामार, धमक्या देण,हल्ले हे दिवसेंदिवस घडत आहेत. रात्रीच्या सुमारास शहराच्या मध्यवर्ती भागात म्हणजेच धरती चौक परिसरामध्ये घरांची आणि वाहनांची जमावाकडून मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली, यातलं नेमकं कारण काय आहे? हे समजू शकले नाही मात्र पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले आणि त्यानंतर धुडगूस घालणार विरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली.
नगर शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या धरती चौकामध्ये सतरंगी मज्जित परिसरात पंधरा ते वीस जणांच्या जमावाने धुडगूस घालून एका घराची व वाहनांची तोडफोड केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. वाहनावर व घरांवर आज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली यामध्ये काहीजण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर घटना समजल्यानंतर तात्काळ कोतवाली पोलीस ठाण्याचे पथक दाखल झाले आहे. उशिरापर्यंत कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये धुडगूस घालणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची काम सुरू आहे वादाची नेमकं कारण अद्यापही समोर आले नाही.
या घटनेत घरातील वस्तूंचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं तर वाहनांच देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, अशा गदारोळ्यामुळे परिसरामध्ये भीतीच वातावरण निर्माण झाल होतं, रात्रीच्या सुमारास अचानक असं काय झालं त्यामुळे जमावाकडून अशा पद्धतीचे कृत्य केले गेलं, याबद्दल परिसरामध्ये चर्चा होऊ लागली.