श्रीकृष्ण हरपला; मुंबईचा दसरा मेळावा जीवावर बेतला, पहा बातमी सविस्तर.
मुंबईला शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे. श्रीकृष्णा मांजरे असं मृतक कार्यकर्त्याचं नाव आहे. मृतक श्रीकृष्णा मंत्री संजय राठोड यांचे समर्थक होते. मृतक मांजरे हे यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालूक्यातील हरसुलचा रहिवाशी होते.
पण या सगळ्या राड्यात एका कार्यकर्त्याला आपला जीव गमवावा लागला आहे. शिंदे गटाच्या कार्यकर्त्याचा मुंबईमध्ये हार्ट अटॅकने मृत्यू झाला आहे.
भिवंडीजवळ शिवशांती लॉन येथे नाष्टा करायला उतरल्यावर त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना तातडीने टेंभी नाका येथील सिटीझ हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते परंतु, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. मांजरे यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे