गुन्हेगारीमाझं गाव

साहेब, मी बायको पोरांचा खून केलाय…या घटनेने कोल्हापूर हादरलं!

खुनासारखे गंभीर गुन्हे करून आरोपी पोलिसापासून दूर पळून जातात, त्याला पकडण्यासाठी पोलिसांना वणवण करावी लागते पण काही निर्ढावलेले खुनी निर्लज्जपणे पोलीस ठाण्यात येवून स्वतःच आपल्या गुन्ह्याची कबुली देतात. अशा घटना क्वचित घडत असल्या तरी पण त्या घडतात. अशा वेळी सुरुवातीला पोलीसाचा विश्वास पटकन बसत नाही पण नंतर मात्र सगळे सत्य पोलिसांच्या समोर येत असते. कोल्हापूर जिल्ह्यात देखील अशीच एक थरारक घटना घडली असून सुरुवातीला पोलीस चक्रावले आणि त्याचा गुन्हा ऐकून हादरले. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील एक नराधम असाच कागल पोलीस ठाण्यात दाखल झाला आणि ‘साहेब, मी बायको आणि दोन पोरांना संपवलेय, मला आत घ्या’ असे म्हणत निर्विकारपणे पोलिसांच्या समोर उभा राहिला.

कोल्हापूर जिल्हयातील मुख्य शहर असलेल्या कागल येथे ही थरारक घटना घडली आहे.पत्नीवरील चारित्र्याच्या संशायावरून पतीने पत्नीसह दोन मुलांची हत्या केल्याचं सांगण्यात येत आहे. आरोपीचं नाव प्रकाश माळी असं आहे. मी पत्नी आणि दोन मुलांना संपवले, असं आरोपीने स्वतः पोलिसांना सांगितलं.

आरोपी प्रकाश माळी (वय ४२ ) हा कागलच्या काळम्मावाडी वसाहतीत कुटुंबासह तापी घरकुलमध्ये राहत होता. मंगळवारी दुपारी प्रकाश आणि त्याच्या पत्नीत वाद झाला. पत्नी गायत्री ( वय ३० ) ही फोनवर बोलत होती. त्यावेळी दोघांमध्ये वाद होऊन भांडण झाले. यातूनच प्रकाशने पत्नी गायत्रीची गळा आवळून हत्या केली. संध्याकाळी मुलगा (वय १० ) घरी आला. मुलाने विचारल्यावर मुलाचीही दोरीने गळा आवळून हत्या केली. यानंतर मुलगी (वय १६ ) घरी घाली. तिनेह सर्व प्रकार पाहून टोहो फोडला. हे पाहून आरोपी तिलाही मारण्यासाठी धावला. यावेळी तिने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण आरोपीने तिच्या डोक्यात वरवंटा घातून तिची हत्या केली.

पत्नी, मुलगा आणि मुलीची हत्या केल्यानंतर आरोपी भावाच्या घरी गेला. आपण बायको आणि मुलांना संपवल्याचे त्याने सांगितले. पण त्यांना विश्वास बसला नाही. यानंतर आरोपी कागल पोलीस ठाण्यात गेला आणि स्वतःहून हत्येची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि चौकशी केली. घडलेल्या घटनेची कबुली देताना आरोपी प्रकाश माळीला कुठलाही पश्चाताप झाला नसल्याचं बोललं जातं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Share this news instead of copying!