” सर, आई तीन दिवसांनी मरणार आहे; आणि…” सुट्टीसाठी शिक्षकाचा विचित्र अर्ज; सोशल मीडियावर तुफान व्हायरल.
एक अत्यंत धक्कादायक असं सुट्टीसाठीच अर्ज सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत आहे. या अर्जावरती जो नमुना लिहिला आहे, तो अत्यंत वाईट आहे. कारण या अर्जामध्ये कोणी लिहिले की त्यांची आई पाच डिसेंबरला मरणार होती, तर कोणी लिहिताय, दोन दिवसांनी पोट दुखेल म्हणून तीन दिवसाच्या सुट्ट्या द्या. अशा अजब गजब प्रकारे सरकारी शिक्षकांनी सुट्टी मागण्यासाठी अर्ज केल्यात जे शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतात विद्यार्थी घडवतात असेच शिक्षक जर अशा पद्धतीने चुकीच्या गोष्टी लिहीत असतील तर या विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडून काय आदर्श घ्यायचा असा प्रश्न उपस्थित राहतो
सुट्टीसाठी केलेले अनेक हटके मेसेज तुम्ही पाहिले असतील. असाच एक मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सरकारी शाळेतील शिक्षकाने सुट्टीसाठी विचित्र अर्ज लिहिला आहे. या अर्जात भविष्यात त्यांच्यासोबत घडणाऱ्या घटनांचा उल्लेख करून रजा मागितली आहे. कुणी लिहितंय की त्याची आई ५ डिसेंबरला मरणार आहे, कुणी लिहितंय की दोन दिवसांनी पोट दुखेल, म्हणून त्याला तीन दिवस सुट्टी द्या.बिहारमध्ये मुंगेर, भागलपूर, बांका यासह अनेक जिल्ह्यांमध्ये असे विचित्र रजेचे अर्ज व्हायरल झाले आहे ,व्हायरल झालेल्या या अर्जांची चौकशी केली. अशा पत्रांच्या माध्यमातून शाळेतील शिक्षक विभागाच्या दोन निर्णयांना विरोध करत असल्याचे समोर आले.
बिहारच्या सरकारी शाळांमधील शिक्षकांना मंगळवारपासून सेल्फीच्या त्रासातून मुक्तता मिळणार आहे. यासोबतच कॅज्युअल रजेवरही सोमवारी मोठा निर्णय होणार आहे. याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नसला तरी संबंधित जिल्हा शिक्षणाधिकारी सोमवारी याबाबत आदेश काढणार असल्याचे बोलले जात आहे.
भागलपूर, बांका आणि मुंगेर जिल्ह्य़ातील विविध ब्लॉक आणि नगरपालिकांच्या शाळांबद्दल शिक्षक सेल्फी पद्धतीने हजेरी लावण्याच्या या निर्णयाला शिक्षकांचा विरोध आहे. यासोबतच महिला शिक्षक सेल्फी पद्धतीने हजेरी लावण्यास टाळाटाळ करतात, असा युक्तिवाद शिक्षकांकडून केला जात होता.