मृत्यूनंतरही आई आली मुलाच्या लग्नाला; हे पाहून नवरदेवाच्या जीवात जीव आला, पहा सविस्तर.
एकीकडे आनंदाचा क्षण आणि दुसरीकडे दुःखाचा डोंगर, प्रत्येक कुटुंबात लग्न सोहळा हा महत्त्वाचा समारंभ असतो. यासाठी अनेक नातेवाईक एकत्र येतात, सर्व मुहूर्तांपैकी लग्न हा एक शुभ मुहूर्त मानला जातो. कधी कधी लग्न सोहळ्यामध्ये एखादी अशी गोष्ट घडते. ज्यानं सर्वांनाच आवक व्हायला होतं, असाच प्रकार एका लग्नामध्ये घडला. तुम्ही विचारही करू शकत नाहीत, मृत्यु झालेली आई पुन्हा आपल्या मुलांच्या समोर आली आहे, तुम्ही म्हणाल एकदा गेलेला व्यक्ती पुन्हा येऊच शकत नाही, मात्र एका मुलाच्या लग्नाला चक्क त्याच्या आई आली आहे.
नवरदेवाच्या मातोश्री शारदा निली यांचे ६ जानेवारी २०२२ रोजी निधन झाले. मेंदू मृत अर्थन ब्रेन डेड झाल्याने त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी शारदा यांचे अवयव दान करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.डॉ. संदीप होळकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याची प्रक्रिया पूर्ण झाली होती. राहुल जयस्वाल या तरुणाला शारदा निली यांचे अवयव प्रत्यारोपण करण्यात आले होते. त्यामुळे राहुल जयस्वाल यांनी उपस्थित राहून शारदा अवयवरुपी असल्याची जाणीव करुन दिली. नवरदेव नितीनला राहुलने आशीर्वाद दिले.शारदा यांचा मेंदू मृत झाल्यानंतर त्यांची किडनी बार्शी येथील डायलिसीस रुग्ण राहुल जयस्वाल यांना प्रत्यारोपण करण्यात आली होती. त्यामुळे जयस्वाल यांना नवजीवन मिळाले.
मृत्यूनंतरही मुलाच्या विवाह सोहळ्याला आईने उपस्थिती लावली. मुलाने तिचे आशीर्वाद घेण्यासाठी आटापाटा केला. हा भावनिक सोहळा पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले होते. मात्र हे कसं घडलं, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर प्रत्यक्षात नाही, मात्र अवयवांच्या रूपातून जणू नवरदेवाची आईच विवाहस्थळी आली होती.शारदा निली यांचा मुलगा नितीन याचा विवाह झाला. पुरुषोत्तम विडप यांची मुलगी भावना हिच्यासोबत त्याने रेशीमगाठी बांधल्या. लग्न सोहळ्याला अवयव रुपाने आई स्व. शारदा निली या उपस्थित राहाव्यात अशी नीली कुटुंबीयांची इच्छा होती. त्यानुसार डॉ. होळकर यांनी जयस्वाल कुटुंबीयांना लग्नाचे निमंत्रण दिले होते. हे निमंत्रण स्वीकारून राहुल जयस्वाल आणि त्यांचे आई, वडील सोहळ्याला उपस्थित होते.
बार्शी येथील नवदाम्पत्य नितीन आणि भावना या दोघांनी आईच्या अवयव रुपी प्रकट झालेल्या राहुल जयस्वाल यांना वंदन करून आईचे आशीर्वाद मिळवले. हा प्रसंग नीली कुटुंबीय आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी खूपच भावनिक होता. यावेळी कुटुंबीयांच्या डोळ्यात दुःखाचे आणि आनंदाचेही अश्रू होते. सोहळ्यातील अनेकांच्या डोळ्याला धार लागली होती.