म्हणून चक्क मुख्यमंत्र्यांना मारले फटके, नेमकं काय आहे कारण ?… पहा सविस्तर VIDEO

तुम्हाला मुख्यमंत्र्यांना फटके दायची संधी मिळाली तर ? पण ते शक्य नाही कारण आपल्या राज्यात तस काही होत नाही , आपण फक्त सोशल मिडीयावर च आगपाखड करतो , मतदान करून आपला लोकप्रतिनिधी निवडून देतो मात्र ते लोकप्रतीनिधी जनतेकडे दुर्लक्ष करतात .
उत्सव जरी एक असला तरी त्यातील श्रद्धेचा भाग हा वेगवेगळा असतो , कारण एका राज्यात चक्क मुख्यमंत्र्यांना फटके द्याची प्रथा आहे , दिवाळी दिवशी हा व्हिडियो viral झाला , मुख्यमंत्र्यांना चाबकाचे ५ फटके मारण्याचा व्हिडियो चांगला शेयर झाला यावर अनेक प्रतिक्रया ही आल्या , हे मुख्यमंत्री कोण आहेत ज्यांना मारलं जात काय आहे ही प्रथा का करावी लागते पाहूयात सविस्तर ….
छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेंद्र बघेल यांच्या हातावर लहान चाबकाचे ५ फटके मारण्यात आल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. छत्तीसगढमधील प्रथा परंपरेनुसार लक्ष्मीपूजनानिमित्त आयोजित सोहळ्यात ही परंपरा जपण्यात आली आहे.
हातावर फटके मारल्यानंतर सुख-शांती येते अशी धारणा येथील परंपरेची आहे. त्यातूनच, मुख्यमंत्र्यांनी या वेदना सहन करत जनतेच्या आयुष्यात आनंद आणि सुख यावे, ही मनोकामना केली.जनते प्रती आपली असणारी भावना व्यक्त करण्यासाठी ही प्रथा महत्वाची आहे.