पदवीधर व डीएड ,बी एड, धारकांसाठी पदभरती सुरू करा शुभांगी ताई पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे.
नागपूर दिनांक 23,
राज्यातील मागील अनेक वर्षांपासून बंद असलेले शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पदभरती तसेच पदवीधरांसाठी विविध खात्यातील बंद असलेल्या पदभरती सुरू करून बेरोजगार पदवीधर तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात याव्या या मागणीसाठी महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या राज्याध्यक्ष तथा नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाच्या एकमेव महिला युवा उमेदवार शुभांगी ताई पाटील यांनी नुकतीच नागपूर हिवाळी अधिवेशनात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले .
राज्यात मागील अनेक वर्षांपासून शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच विविध खात्यांमधील पदभरती बंद असून त्यामुळे अनेक पदवीधर सुशिक्षित तरुणांना बेरोजगारीला सामोरे जावे लागत आहे राज्यातील शिंदे भाजप सरकार व मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडून पदवीधर तरुणांच्या फार अपेक्षा आहेत व त्या अपेक्षा शिंदे फडणवीस सरकार नक्कीच पूर्ण करेल या अपेक्षेने नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाच्या युवा उमेदवार तथा महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या राज्याध्यक्ष सौ शुभांगी ताई पाटील यांनी शिक्षण क्षेत्रातील पदभरती सुरू करण्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री व शिक्षण मंत्री यांना नुकतेच नागपूर येथे जाऊन निवेदन दिले.
विधान भवनात सामान्य माणसाला जाण्याचा संवैधानिक आधीकार नसतांना देखिल शिक्षक-पदविधरांच्या व कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी शुभांगी ताई पाटील यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात आमदार नसतांनाही सदनात जाऊन मुख्यमंत्री ,उप-मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री व विविध नेत्यांच्या भेटी घेऊन पाठपुरावा केला व खालील महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले याचबरोबर राज्याध्यक्ष शुभांगी ताई पाटील यांनी शिक्षण क्षेत्रातील विविध समस्यांबाबत देखील मुख्यमंत्री राज्याचे शिक्षण मंत्री माननीय दीपक जी केसरकर साहेब तसेच वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीशजी महाजन साहेब यांची भेट घेऊन त्यांना निवेदने देऊन शिक्षण क्षेत्रातील समस्या दूर करण्याबाबत मागणी केली यामध्ये प्रामुख्याने
1) दि 12 व 15 फेब्रुवारी रोजी अगदी क्षुल्लक-क्षुल्लक कारणास्तव अपात्र केलेल्या विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शाळांना या वर्षी लागु झाला असता तो म्हणजेच आताचा म्हणजे किमान 40 %चा व 60 टक्के चा अनुदानाचा टप्पा देऊन त्यांच्या वरील होणार अन्याय दूर करण्यात यावा या साठी मा मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, तसेच उप-मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब ,शिक्षण मंत्री माननीय दीपक जी के सरकर साहेब, वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय गिरीश महाजन साहेब यांची भेट घेऊन त्यांना त्रुटी संदर्भात स्वतंत्र निवेदन देऊन चर्चा केली व लवकरात लवकर याबाबत निर्णय घेण्याची व शासन आदेश निर्गमित करण्याची मागणी केली.
2) नव्याने अनुदान मंजूर केलेल्या 20% ,40% व 60 टक्के शाळांच्या अनुदानाचा शासन निर्णय तात्काळ काढण्याबाबत व याद्या लावण्या बाबत चर्चा करून लवकरात लवकर शासन निर्णय निर्गमित करण्याची विनंती केली.
3) सन 2005 पूर्वी व पाच नंतर नोकरीला लागलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पुन्हा विचार करण्याबाबत विनंती केली व इतर राज्यांप्रमाणे आपल्याही राज्यात जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत ची मागणी केली
4) प्रस्तावित वाढीव पदांना मंजुरी देण्यात येऊन त्यांचा लवकरात लवकर शासन निर्णय निर्गमित करण्याबाबत व त्यांचे पगार सुरू करण्याबाबत आग्रही विनंती केली.
5 ) अर्जित रजा, मेडिकल बिल ,सातव्या वेतन आयोगाचा फरक ,कर्मचारी पीएफ, यांच्यासाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करत निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली तसेच नाशिक विभागातील अनेक जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये वेतनासाठी पैसे न टाकल्यामुळे शिक्षकांचे पगार वेळेवर होत नव्हते त्यासाठी पाठपुरावा करून पत्रनिर्मित करण्यास सांगितले व त्यानुसार कालच पत्र निर्गमित करून घेतले.
6) माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक शाळा, ज्युनिअर कॉलेज यांच्यावर काम करणाऱ्या पीएचडी धारक प्राध्यापकांना त्यांच्या शिक्षणा नुसार योग्य ती वेतन श्रेणी देण्याबाबत माननीय शिक्षण मंत्री यांना निवेदन देऊन त्यांना योग्य वेतन देण्याची मागणी केली.
7 ) कालच्या हिवाळी अधिवेशनात शुभांगी ताई पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब यांची विशेष भेट घेत राज्यातील पदवीधर तरुणांसाठी नोकऱ्या उपलब्ध करून देण्याबाबत विशेष मागणी केली असून डीएड बीएड धारक तसेच पीएचडी धारक विद्यार्थ्यांसाठी लवकरात लवकर पदभरती सुरू करण्याची विनंती केली व त्याबाबत माननीय मुख्यमंत्री साहेब यांना स्वतंत्र निवेदन देत पदभरती बाबत चर्चा केली त्यास माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच सर्वच क्षेत्रांमध्ये पदभरती सुरू करण्याच्या आश्वासन दिले
8) राज्यातील इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजेच आयसीटीच्या शिक्षकांबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यात येऊन त्यांना कायमस्वरूपी नोकरीत सामावून त्यांचे वेतन निश्चिती करण्यात यावी याबाबत शिक्षण मंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी केली व लवकरच हा प्रश्न मार्गी लावण्याबाबत पाठपुरावा केली
या पाठपुराव्या सोबतच नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाच्या एकमेव महिला युवा उमेदवार म्हणून शुभांगी ताई पाटील यांनी राज्यातील शिंदे- भाजप सरकारने शिक्षकांसाठी शिक्षकांच्या अनुदानासाठी 1160 कोटी रुपये मंजूर केल्याबद्दल अभिनंदन पत्र देत ,माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब,वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय गिरीश भाऊ महाजन साहेब व शिंदे- भाजप सरकारचे महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या वतीने आभार मानले.