कानिफनाथ यात्रेत विघ्न संतोषी लोकांनी गालबोट लावण्याचा प्रयत्न केला तर कडक कारवाईचा इशारा- सपोनि विजय झंजाड.
खर्डा येथील ग्रामदैवत श्री कानिफनाथ यात्रा २४-३-२०२४ व २५-३-२०२४ अशी यात्रा दोन दिवस असुन २३-3-२०२४रोजी खर्डा शहरातून भव्य सदंल (छबीना) मिरवणूक असते व तर काही ठिकाणी नृतिका डान्स कार्यक्रमाचे आयोजन असते तर दुसर्या दिवशी कानिफनाथ यात्रा भरते अशा गर्दीत महिलांना, मुलींची छेड काढणे, यात्रेतील दुकानदारांकडून दादागिरी करून पैसे उकळण्याचा प्रयत्न, महिलांची दागिने, पर्स चोरणे किंवा कायदा सुव्यवस्था बिघवडण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणी ही व्यक्ती असो कडक कारवाई करणार
खर्डा पोलीस स्टेशन कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत मदिंरा जवळ महीला व पुरुष दर्शन रांग वेगळी असणार पाळणे खेळाच्या ठिकाणी गर्दी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार यात्रेत जुगार सारखे खेळ बंद करण्यात येणार.
खर्डा ग्रामपंचायत च्या माध्यमातून यात्रे करूना पिण्याचे पाणी, बसण्यासाठी मंडप, लाईट, वाहतुकीसाठी मोठे रस्ते.अरोग्य व्यवस्था ,ऍब्युलन्स अशा अनेक सूविधा केलेल्या आहेत या वेळी शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष विजयसिंह गोलेकर, सरपंच सौ संजिवनी पाटील,माझी सरपंच संजय गोपाळघरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सुनील लोंढे,महालिंग कोरे, श्रीकांत लोखंडे, डॉ सोपान गोपाळघरे यांनी यात्रेच्या सुविधा व कायदा सुव्यवस्था बाबतीत मनोगत व्यक्त केली या वेळी मोठ्या संख्येने खर्डा ग्रामस्थ व पत्रकार हजर होते.