लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशीला बोलवले, याचा धसका घेऊन पाहा कर्मचाऱ्याने काय करून घेतले पहा सविस्तर.
आपण पाहतो की आजकाल सगळीकडे एसीबी, एलसीबी यांच्या त्याचप्रमाणे एफ डी आय यांच्या राज्यामध्ये तसेच इतर राज्यांमध्ये धाडी पडत आहेत. यामध्ये कित्येक मोठमोठे उद्योजक म्हणा किंवा मोठ्या पदावर असणारे अधिकारी म्हणा हे रंगेहात पकडले जात आहेत. यामुळे कुठेतरी भ्रष्टाचाराला आळा बसेल असे सर्वसामान्य जनतेला वाटत.
अशीच एक घटना भंडारा या ठिकाणी घडली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एका कर्मचाऱ्यावर कारवाई केली व चौकशीसाठी वन विभागाच्या क्षेत्र सहाय्यकाला बोलवण्यात आले. आणि चौकशीला बोलावण्यात आले म्हणून या कर्मचाऱ्यानी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ते कांद्री वनपरिक्षेत्रातील गायमुख जंगलात लोहारे हे लेंडेझरी वनपरिक्षेत्र कार्यालयामध्ये कार्यरत होते ते एकटेच भाड्याने राहत असायचे.
वनपरिक्षेत्र कार्यालयातील दोन वनरक्षक आणि एका वनमजुरावर भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेतल्याप्रकरणी कारवाई केली होती. हे तीनही कर्मचारी लोहारे यांच्या हाताखाली कामाला होते. त्यामुळे एसीबीने या प्रकरणाच्या चौकशीसाठी लोहारे यांना बोलविले होते. आणि याच प्रकाराचा त्यांनी जबर धसका घेतला. बऱ्याच दिवसापासून लोहारे हे बेपत्ता होते त्यांचा शोध घेतला असता ते सापडली नाही.
या दरम्यान वनपरिक्षेत्राचे वन कर्मचारी गायमुखच्या जंगलात गस्तीवर असताना लोहारे यांचा मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये आढळून आला. त्यानंतर वन कर्मचाऱ्यांनी ही माहिती वन विभागाला दिली. याबाबत आंधळगाव पोलीस स्टेशनमध्ये नोंद केली असून लोहारे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, नातवंडे असा परिवार आहे. लोहारे यांच्या जाण्याने त्यांच्या पाठीमागे लोकरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.