सोशल मीडियावर रील्स बनवण्याची सवय महिलेसाठी ठरली जीवघेणी; वैतागुण पतीने पत्नीसोबत पहा काय केले.

अनेकांना रील्स बनवन आणि रील्स पाहन खूप आवडत असत मात्र हीच सवय जीवघेणी आहे, हाच एक प्रताप सोशल मीडिया viral होत आहे , सोशल मिडियाचे अनेक जसे फायदे आहेत, तसेच त्याचे अनेक तोटेदेखील आहेत. गुन्हेगारी वाढण्यामागे सोशल मीडिया काही प्रमाणात कारणीभूत ठरत असल्याचं बोललं जातं. सोशल मीडियावर रील्स बनवून शेअर करण्याची सवय एका महिलेसाठी जीवघेणी ठरली आहे.
पत्नीच्या रील्सला वैतागून पतीने तिची हत्या केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. पत्नीच्या रील्स बनवण्याच्या सवयीला पती वैतागला होता. त्यामुळे त्याने हे पाऊल उचललं.तमिळनाडूच्या तिरुपूर जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. पत्नी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रील बनवत असल्याने संतापलेल्या पतीने पत्नीची शालने गळा आवळून हत्या केली. 38 वर्षांच्या व्यक्तीने आपल्या पत्नीचा शालने गळा आवळून खून केला आहे. या घटनेनंतर पतीला अटक करण्यात आली आहे.
पत्नी सोशल मीडियावर रील बनवण्यात बराच वेळ घालवयाची. पत्नीच्या या सवयीमुळे पती खूप नाराज होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.दिंडीगुलमधल्या 38 वर्षांच्या अमृतलिंगम याचा विवाह चित्रासोबत झाला होता. हे दाम्पत्य तिरुपूरच्या सेलमनगरमध्ये राहत होतं. अमृतलिंगम हा तेन्नम पलायम भाजी मार्केटमध्ये रोजंदारी मजूर म्हणून काम करायचा. चित्रा एका गारमेंट फॅक्टरीत काम करत होती.ते दोघे व्हिडियो बनवत.
चित्राची रील अपलोड करण्याची सवय आणि चित्रपटांमध्ये काम करण्याची तिची इच्छा यावरून रविवारी रात्री दोघांमध्ये जोरदार वाद झाला. या दोघांमधला वाद विकोपाला गेला आणि अमृतलिंगमने चित्राचा शालने गळा आवळला. चित्रा बेशुद्ध पडल्यावर अमृतलिंगम घाबरला आणि घरातून बाहेर पडला,तिच्या हत्येची माहिती त्याने दिली आहे.