चिमुरड्याने घर घेतलं डोक्यावर पण बाप्पाला सोडेना; डोळ्यात पाणी आणणारा Viral Video पहिला का ?
गणेशोत्सव हा सर्वांना आवडत असतो, गणेशोत्सवाची धामधूम तुम्ही सर्वत्र पहात असाल. गणेशोत्सव जितका मोठ्यांना आवडतो, तितकाच तो लहानग्या यांना देखील आवडतो. दहा दिवस आपल्या घरात गणपती बाप्पा विराजमान होतो. त्याचे सर्व लाड केले जातात, त्याला मोदक खाऊ घातले जातात, सुंदर सजावट केली जाते आरती आणि प्रसाद हे सगळं प्रत्येकाला खूप प्रसन्नदायी वाटत असतं. लहान मुलांमध्ये गणपती बाप्पाची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते असाच एक मनाला भावुक करणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतो.
यामध्ये एक चिमुकला गणपती बाप्पा यांना घट्ट मिठी मारून बसला. या बापांचा विसर्जन करायचा आहे मात्र तो काही केल्या ही मूर्ती आपल्या वडिलांकडे देत नाही, यासाठी तो मोठ्याने रडतोय, ओरडतोय मात्र बाप्पा मला सोडून जाऊ नका असं देखील म्हणतोय. हा व्हिडिओ सोशल मीडिया वरती तुफान व्हायरल होतो आहे. लाखोच्या संख्येने लोकांनी या व्हिडिओला पाहिला आहे. सदरील व्हिडिओ ganesh_officals_pargi या पेजवर अपलोड केला गेला आहे.
शेवटी आई मध्यस्थी करते आणि गणपती बाप्पांना विसर्जनासाठी वडील घेऊन जातात मात्र मुलगा काही ऐकत नाही, तो तसाच रडत राहतो हा व्हिडिओ पाहून आपल्याला देखील वाटत असेल की, याला गणपती बाप्पा बद्दल किती प्रेम आहे. देवाची एक मूर्ती ही लहान मुलाला देखील तितकंच आपलंसं करून ठेवते. दहा दिवसात आपल्या सोबत असणारे गणपती बाप्पा हे सगळ्यांनाच हवे हवेचे असतात. मात्र नंतर विसर्जन करून ”गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर, या अशी साद आपण त्यांना घालत असतो. हा गणेशोत्सव तुम्हाला सर्वांना आनंदाचा आणि नवीन ऊर्जा देणारा जावो !.