अत्यंत किळसवाणा प्रकार, जेवण द्यायला आलेला डिलिव्हरी बॉय जेवणावरच थुंकला.
बऱ्याच वेळेस असा प्रश्न पडतो की आपण ऑनलाईन ऑर्डर केलेले जेवण पूर्णपणे स्वच्छ आणि शुद्ध असते का यावर अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल देखील झाले आहेत. आज काल लोकांना ऑनलाइन जेवण ऑर्डर करायची सवय लागली आहे. जेव्हा कधी त्यांना घरी स्वयंपाक बनवायचा कंटाळा येतो किंवा काहीतरी बाहेरचं खावं असं वाटतं तेव्हा तेव्हा लोक ऑनलाइन जेवण ऑर्डर करण्याचा पर्याय निवडतात. ऑनलाईन ऑर्डर केल्यानंतर जेवण पूर्णपणे स्वच्छ आणि शुद्ध असते का यावर अनेक वेळा प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आहे आणि यावर अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल देखील झाले आहेत आणि असे असतानाच आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
ज्यामध्ये डिलिव्हरी बॉय असा किळसवाणा प्रकार करत आहे की जो तुम्ही पाहिल्यानंतर यापुढे ऑनलाईन ऑर्डर कधीही करणार नाही कारण या डिलिव्हरी बॉय ने डिलिव्हरी दिल्यानंतर चक्क त्या जेवणावर थुंकला आहे.
या व्हायरल व्हिडिओमध्ये जे दिसेल ते पाहून कुणालाही धक्का बसेल कारण अनेक जण हे ऑनलाईन फूड ऑर्डर करत असतात डिलिव्हरी बॉईजवर विश्वास ठेवून जेवण मागवतात परंतु हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अशा घटनांमुळे ग्राहकांच्या विश्वासाला तडा जातो हा व्हिडिओ कुठला आहे माहित नाही पण या व्हिडिओमध्ये एक डिलिव्हरी बॉय ऑर्डर केलेल अन्न घेऊन ग्राहकाच्या घरी येतो. त्यानंतर तो ऑर्डर घराबाहेर ठेवतो मात्र ग्राहकाने त्याच्यासाठी टीप ठेवलेली नसते म्हणून त्याला त्याचा राग येतो आणि म्हणून तो अश्या पद्धतीने वागतो
तसेच नाराज झालेल्या या डिलिव्हरी बॉयने ग्राहकाच्या जेवणावर तीन वेळा थुंकून तिथून निघून गेल्याचं या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे सदरील घटना घराबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामुळे लक्षात आली आहे. त्यानंतर हा व्हिडिओ ग्राहकाने सोशल मीडियावर पोस्ट केला आणि तो सध्या मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल देखील होत आहे.
एका १३ वर्षाच्या मुलाने व त्याच्या आईने ही जेवणाची ऑर्डर दिली होती. त्या दोघांनी घराच्या डोअर बेल कॅमेरा मधून पाहिलं म्हणून त्यांच्या हि गोष्ट लक्षात आली शिवाय जेवण पोहोचण्यासाठी डिलिव्हरी बॉयसाठी ३$ म्हणजेच 250 रु टीप देखील ठेवली होती तरी देखील त्याने असं वागल्याने कंपनीने त्याला कामावरून काढून टाकलं.