बेडकाला गिळायला आला धावून साप, पण बेडकाने असे काही केल कि पहा कशी झाली सापाची फजिती
सोशल मीडियाचे जग हे अशा विविध गोष्टींनी भरलेले आहे की ते पाहून आपल्याला नक्कीच आश्चर्य वाटेल. शिवाय सोशल मीडिया मनोरंजनाने परिपूर्ण देखील आहे, म्हणूनच तर इथे एकदा का एखादा व्यक्ती आला की त्याचा तासन तास वेळ कसा जातो हे त्याचं त्यालाच कळत नाही. कित्येक वेळा आपण पहिले आहे कि साप हा बेडकाला खात असतो पण सदरील व्हिडिओ मध्ये अगदी त्याच्या उलटे घडलेले दिसत आहे.
सध्या एक असाच आश्चर्य चकीत करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये शिकाराचीच शिकार झाल्याचे तुम्हाला पाहायला मिळेल. आपल्याला माहित आहे कि बेडूक हे सापाचे आवडते अन्न आहे पण असं असलं तरी देखील एका बेडकानेच चक्क सापाला आपला शिकार केला आहे.
काही सेकंदांच्या व्हिडीओमध्ये एक साप भक्ष शोधात इकडे तिकडे भटकत असल्याचे दिसत आहे. इतक्यात त्याची नजर तिथे आरामात बसलेल्या बेडकावर पडली. समोर भक्ष्य पाहून सापाने लगेच त्यावर हल्ला केला. पण काही सेकंदात सर्वकाही बदलले. शिकार करायला आलेला शिकारी सापच अखेर बेडकाचा हातून
बळी ठरला.
या मोठ्या बेडकाने सापाला आपल्या तोंडात पकडले आहे. हे व्हिडीओत देखील स्पष्टपणे पाहू शकता. या बेडकाने सापाची शेपटी आपल्या तोंडात पकडली आणि तो हळूहळू सापाला गिळत आहे. सपासोबत असे काही घडेल असा विचर बिचाऱ्या सापाने सुद्धा केला नसेल. शिकारीसाठी आलेला साप बेडकापासून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे, पण बेडूक काही त्याला सोडायला तयार नाही असे व्हिडिओमध्ये दिसत आहे. व्हिडीओ इन्स्टाग्रामवर animals_powers नावाच्या हँडलसह शेअर करण्यात आला आहे, ज्याने काही वेळातच हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळवले आहेत.