जिल्हाधिकारी कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या त्या तरुणाने चिट्टीत लिहिलं होत अस काही..
जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एक धक्कादायक प्रकार घडला, एका तरुणांना चक्क विषारी औषध सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांनी आत्महत्या कुठल्या कारणामुळे केली याचा तपास पोलीस करत आहेत ,नेमकं घडलं काय? हा तरुण कुठला, आहे यावरती नजर टाकूया, श्रीगोंदा तालुक्यातील घोटवी गावाचे युवा सरपंच अविनाश मिस्टर चव्हाण यांनी मंगळवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
दरम्यान तेथे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी त्याला तत्काळ वाहनातून जिल्हा रूग्णालयात दाखल केले आहे. तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.चव्हाण यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाचव्या मजल्यावर जाऊन विषारी औषध घेत आत्महत्येचा प्रयत्न केला.प्रशासनाला या तरुणाचे प्राण वाचवण्यात यश आलेला आहे. मात्र या तरुणाने कुठल्या निराशातून एवढ्या मोठ्या टोकाचे पाऊल उचललं यावरती आता पुढील दिशा ठरणार आहे. हा तरुण गावाचा सरपंच होता त्यातून त्याला काही त्रास होत होता का अशा अनेक शंका व्यक्त केल्या जात आहेत.
या तरुणाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याच्या कडे एक चिट्ठी मिळाली. त्या चिट्टीमध्ये धक्कादायक माहिती समोर आली, या तरुणाकडे चव्हाण यांच्या जवळ एक चिठ्ठी सापडली असून यात त्यांना होणार्या त्रासाचे कारण नमूद असल्याचे समजते. सदरचा प्रकार नाजूक प्रकरणातून घडल्याचीही चर्चा सुरू आहे. त्या अनुषंगाने त्याला त्रास देणाऱ्या लोकांवर योग्य ती कारवाई देखील केली जाईल.
दरम्यान याप्रकरणी जिल्हा रूग्णालयातून तोफखाना पोलीस ठाण्यात घटनेची माहिती देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात घटना घडलेली असल्याने जिल्हा प्रशासनाकडून तक्रार प्राप्त होताच, पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे तोफखाना पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी सांगितले