नाशिकचे पोलीस आयुक्त, विशेष पोलीस महानिरीक्षक यांची बदली.
प्रतिनिधी तुषार झेंडफळे
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राज्य सरकारने आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. नाशिक शहराचे पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे आणि नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांची बदली झाली आहे.
अंकुश शिंदे यांची नाशिकच्या पोलिस आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे.अंकुश शिंदे हे याआधी पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त होते. तर या बरोबरच विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांच्या जागी नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षक पदी सुनील फुलारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जयंत नाईकनवरे यांनी नाशिकसह सातारा, वर्धा, पुणे, मुंबई जिल्ह्यांमध्ये सेवा बजावली आहे. त्यांच्या कार्यकाळात शहरातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांनी विशेष उपक्रम राबविले.