कधी काळी टिक टॉक वर फेमस असणारा टिक टॉक स्टार संतोष मुंडे सह एकाचा विजेचा करंट लागून मृत्यू.
काही दिवसापूर्वी टिक टॉक हे सर्वांनाच माहीत होतं आणि याच टिक टॉक वर संतोष मुंडे हा स्टार झाला होता. संतोष मुंडे याचे टिक टॉकवर खूप फॉलोवर्स होते. पण याच संतोष मुंडेसह आणखी एकजण सोबत मंगळवार दिनांक 13 सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान एक घटना घडली आहे.
हा टिक टॉक स्टार संतोष मुंडे व बाबुराव मुंडे हे दोघं भोगलवाडी ते काळेची वाडी रस्त्यावर असलेल्या विजेच्या डीपीच्या फ्युज टाकण्यासाठी गेले होते पण फ्युज टाकत असताना अचानक वीज आल्यामुळे या दोघांना करंट लागला आणि यामध्ये त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
ही घटना समजतात समाज माध्यमातून तीव्र दुःख व्यक्त केले जात आहे. संतोष मुंडे याने टिक टॉकच्या माध्यमातून आपली स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली होती. आणि त्याच्या असं अकाली निधनामुळे सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे. सदरील घटनेची नोंद धारूर पोलिसांमध्ये केली जात आहे.
त्यामुळे जर कधी आपण देखीलासे विजेसादर्भात काही काम करायला जात असाल तर वीज कधी येणार आहे याबाबतची शहानिशा नक्की करत जा म्हणजे अश्या काही घटना आपल्या सोबत देखील घडणार नाही. कुटुंबातील एखाच्या जाण्याने कुटुंबात खूप फरक पडत असतो.