10 वर्षानी मोठ्या नवऱ्यामुळे प्रेम व रोमांस नसलेल्या लग्नात अडकली गेलीये, आणि अचानक घडले असे काही.
लग्न हा एक संस्कार आहे , लग्न ही माझ्या आयुष्याला कलाटणी देणारी घटना ठरली. आपण म्हणतो की लव्ह मॅरेज करणाऱ्यांचीच लग्न टिकतात. त्यांना एकमेकांना समजून घेणे सोप्पे जाते. ते जास्त खुश आणि आनंदी राहू शकतात. लोकांना वाटते की अरेंज्ड मॅरेज्ड करणाऱ्यांना संसार करणे सोप्पे नसते. ते खुश राहू शकत नाहीत किंवा सुखाचा संसार करू शकत नाहीत. पण मंडळी मी ही गोष्ट नाकारते आहे. जेव्हा लग्न ठरवून होते तेव्हा त्यात दोन अनोळखी व्यक्ती एकत्र येतात.
तेव्हा त्यांना एकमेकांना समजून घ्यायला थोडे अवघड जाते हे जरी खरे असले तरी त्याचा अर्थ असा अजिबात नाही की त्यांचा संसार सुखाच होऊ शकत नाही. जर त्यांनी स्वत:च्या मनात आणलं तर ते एक सुखी आयुष्य जगू शकतात, एका अनामिक स्त्रीच्या जीवनाची ही कहाणी , आपला पती रोमांटीक नाही अस म्हणतात आपल्या भावना व्यक्त केल्या.
लहानपणापासून मी रोमँटिक चित्रपट पाहत मोठी झाली होती. जसं पिक्चर मध्ये दाखवतात तसा माझा संसार असेल अशी माझी स्वप्ने होती. पण जे माझ्यासोबत घडलं ते अगदीच या विरुद्ध होतं. माझ्यापेक्षा 10 वर्षे वयाने मोठ्या असणाऱ्या व्यक्तीसोबत माझं लग्न झालं. मी अवघी 20 वर्षांची होते. आम्ही एकमेकांना ओळखत नव्हतो आणि एवढचं काय तर एकमेकांशी साधं बोललो देखील नव्हतो. पण नियतीने आमची गाठ आधीच बांधली होती आणि त्याप्रमाणे आम्ही विवाह बंधनात अडकलो.हळूहळू आम्ही दोघांनी पुढाकार घ्यायला सुरुवात केली. त्यांनी सुद्धा जसा मला रोमँटिक पती हवा होता तसे बनण्यास सुरुवात केली आणि काही काळातच आमचा बेचव संसार फुलून गेला. आमच्यातला लाजाळूपणा दूर निघून गेला आणि आम्ही खऱ्या अर्थाने रोमँटिक कपल झालो. त्यांच्या छोट्या छोट्या वागण्यातून ते माझ्यावर रोज प्रेमाचा जणू वर्षाव करू लागले. या सवयींमधून मी शिकले की प्रेम ही काही एक ठराविक किंवा नियमांत बांधलेली भावना नाही.
तर ती एक अशी भावना आहे ज्यात समोरच्याला आहे तसं स्विकारणं. मी तुमच्यापासून लपवू इच्छित नाही आज आम्ही अशा टप्प्यावर पोहोचलो आहोत जिथे लोक आम्हाला ‘हॅपी कपल’ म्हणतात. होय, आता मी कॅन्डल लाईट डिनर किंवा त्यांनी दिलेल्या गुलाबांमध्ये प्रेमाचे मोजमाप करत नाही. तर त्यांच्या सवयी माझ्यासाठी सर्वकाही आहेत. माझे पती घरी परतल्यानंतर आता सांसारिक गोष्टींबद्दल अजिबात बोलत नाहीत. तसेच ऑफिसला जाण्यापूर्वी मला निरोप देताना किस करण्यासही विसरत नाहीत. आम्ही दोघेही एकमेकांसाठी थोडे बदललो आहोत. आमच्या अपेक्षाही बदलल्या आहेत. या बदलामुळेच आमचे वैवाहिक जीवन कायमचे सुखी झाले. मला आनंद आहे की मी या नात्याला एक चान्स दिला आणि मी खरंच खूप खुश आहे.”
लग्न जरी माझ्या मर्जीने झाले नसले तरी मला आशा होती की ज्याप्रमाणे मी पिक्चर मध्ये नवीन संसार पाहिला होता तशीच माझ्या सुद्धा संसाराची सुरुवात असेल. पण तसे काहीच झले नाही. मी जेव्हा लग्न करून त्या घरात पहिले पाउल टाकले तेव्हा मला सुद्धा आपण काहीतरी नवीन सुरुवात करतो आहोत असे वाटले पानही. न मला माझ्या पतीच्या चेहऱ्यावर व त्यांच्या डोळ्यात तसे काही दिसत होते. आम्ही अगदीच अनोळखी पणे वागत होतो. आमच्यात ना प्रेम होते ना प्रेमाची सुरुवात करण्याची इच्छा होती. पहिल्या नजरेत प्रेम होते वगैरे या गोष्टींवरचा माझा विश्वास तेव्हा पहिल्यांदा उडाला.