आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना अशी दिली वागणूक, 17 सीटर वाहनात कोंबले ” इतके ” विद्यार्थी पहा बातमी सविस्तर.
यापूर्वी ही विद्यार्थी कोंबणे अशी घटना घडली आहे , गोंदिया जिल्ह्यात नुकताच एक भयानक प्रकार समोर आला. खेळून झाल्यावर विद्यार्थ्यांना चक्क टेम्पोमध्ये भरून आणण्यात आले. त्यात बरेच विद्यार्थी असल्यानं त्यांचा श्वास कोंडला होता. त्यामुळं विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. या प्रकरणी आश्रमशाळेतील क्रीडा शिक्षक, मुख्याध्यापक यांच्यावर कारवाई झाली.
परतवाडा शहरातील अंजनगाव स्टॉपवर हा धक्कादायक प्रकार घडला , अमरावती जिल्ह्यातील मेळघाटच्या आदिवासी भागातील चिमुकल्या विद्यार्थ्यांना गावी सोडण्यात येत होते. त्यासाठी 17 सीटर वाहनात 57 आदिवासी विद्यार्थी गुराढोराप्रमाणे कोंबले होते. हा संतापजनक प्रकार समोर आला.घाबरलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढून दुसऱ्या वाहनाने पाठविण्यात आले. पोलिसांनी वाहनाविरुद्ध फक्त दंड आकारला. चांदूरबाजार तालुक्यात येणाऱ्या बोराळा येथे सामाजिक न्याय विभागामार्फत असलेल्या अनुदानित आश्रमशाळा आहे .
ही आश्रमशाळा संस्थेमार्फत चालविण्यात येते. इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत विद्यार्थी आहेत. या निवासी आश्रमशाळेत मेळघाटमधील आदिवासी विद्यार्थी आहेत. मेळघाटच्या दुर्गम व अतिदुर्गम आदिवासी पाड्यातील हे विद्यार्थी आहेत.परतवाड्यापासूनच 100 ते 150 किलोमीटर अंतरापर्यंत 17 प्रवासी संख्या असलेल्या वाहनात 57 विद्यार्थी कोंबून नेत असल्याने विद्यार्थी भेदरलेले होते. अशी माहिती किशोर वाघमारे यांनी दिला.
विद्यार्थ्यांना अशाप्रकारे कोंबून नेणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न यानिमित्तानं उपस्थित होतो. ही व्यवस्था कुणी केली. संबंधित जबाबदार व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली आहे.