तुळजाभवानी देवस्थानचा विकास करणार -जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे.
तुळजापूर ( सचिन ठेले ) श्रीतुळजाभवानी मातेच्या यंदाच्या निर्बंध मुक्त नवराञोत्सवात सर्वांनी दिलेल्या अमुल्य योगदाना मुळे हा नवराञोत्सव निर्विघ्न शांततेत पार पाडल्या बद्दल मी सर्वाचे आभार मानतो असे प्रतिपादन तुळजाभवानी मंदीर संस्थान अध्यक्ष तथा जिल्हाअधिकारी डाँ सचिन ओंबासे यांनी बुधवार दि १२ रोजी आयोजित संवाद व आभार प्रदर्शन कार्यक्रमात केले.
यावेळी व्यासपीठावर अप्पर जिल्हाअधिकारी विश्वस्त तथा उपविभागीय अधिकारी योगेश खैरमाटे उपविभागीयपोलिसअधिकारी सई भोर पाटील तहसिलदार सौदागर तांदळे महंत हमरोजीबुवा पो नीअदिनाथ काशीद मुख्याधिकारी अरविंद नातू वृषाली तिल्लोरे माजीजिप अध्यक्ष धिरज पाटील तिन्ही पुजारी मंडळ अध्यक्ष सर्वश्री सज्जन सांळुके अमर परमेश्वर अनंत माजी पुजारी मंडळ अध्यक्ष किशोर गंगणे माजी सचिव. प्रा धनंजयलोंढे अदि उपस्थितीत होते.
प्रथमता नवराञोत्सवात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या अधिकारी कर्मचारी पञकार यांना सन्मानपञ व देविची प्रतिमा देवुन सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना डा़ँ ओबासे म्हणाले कि नवराञोत्सवात मला धार्मिक विधी करण्याचा मान मिळाला या बद्दल मी स्वताला भाग्यवान समजतो असे स्पष्ट करुन शाषणाने संधी दिली त्या बाबतीत शाषणाचे विशेष आभार मानतो तिर्थक्षेञ तुळजापूर ला येणाऱ्या भक्तांची गैरसोय होवु नये त्यांना सुलभ समान दर्शन घडावे यासाठी शाषणाने श्रीतुळजाभवानी विकास आराखड्या तयार करण्यास आम्हाला सांगितले असुन याचे काम लवकरच सुरु होणार
तिर्थक्षेञासाठी देणार आहे.भाविकांच्या वाढत्या संखेच्या पार्श्वभूमीवर पुढील अधिक वर्ष उपयोगी पडेल असा आराखडा तयार करण्याचा प्रयत्न असणार आहे. या अराखड्यात सर्वसमावैशक गोष्टीचा समावेश असणार असुन गर्दी व भाविकांना सुलभ समान दर्शन हा या विकास आराखड्याचा गाभा असणार आहे
विकास आराखड्यात कुणावरही अन्याय होवु दिला जाणार नाही सर्वाना विश्वासात घेऊन विकास आराखडा तयार केला जाणार आहे. तिर्थक्षेञ बालाजी धर्तीवर विकास करण्याचा असुन आँनलाईन दर्शन व्यवस्थेवर यापुढे भर असणार आहे. विकास आराखडातील कामे होण्याकडे लक्ष दिले जाणार आहे. सिंहासन अभिषेक पुजे बाबतीत लवकरच निर्णय घेणार असल्याचे यावेळी म्हणाले ,
यावेळी बोलताना धिरज पाटील यांनी तिर्थक्षेञी भौतिक सुविधांचा विशेषता स्वछतागृहाचा अभाव असल्याचे स्पष्ट करुन याची दखल शाषणाने घेणे गरजेचे असल्याचे सांगितले. यावेळी आनंद कंदले यांनी आ राणजगजितसिंहजीपाटील यांच्या वतीने बोलताना म्हणाले की यंदाचा नवराञोत्सव सार्वाचा प्रयत्नातुन निर्विघ्न पार पडल्या बद्दल आ पाटील यांच्या वतीने सर्वाचे आभार मानले. विश्वस्त तथा तहसिलदार सौदागर तांदळे सर्वाचे आभार मानले