दोन ट्राफिक पोलिसांना रंगेहात पकडले; Video होत आहे व्हायरल, पहा बातमी सविस्तर.
सोशल मिडिया मार्फत व्हायरल होण्यापासून कोणताच अधिकारी वाचला नसेल, सरकारी कर्मचारी असू अगर खासगी कर्मचारी कित्येकदा लाच घेत असतात आणि त्याचप्रमाणे लाच घेताना कित्येकदा कॅमेरा मध्ये शूटिंग मध्ये पण सापडले आहेत. आणि त्यांना या सगळ्याची अजिबात पण भनक पण नसते. आणि अश्या वेळेसच ते नेमके अडकेल जातात असा काहीसा किस्सा सोलापूर मध्ये घडला आहे. चक्क २ ट्राफिक पोलीस मोबाईल मधील शुटींग मध्ये आले आहेत आणि मोठ्या प्रमाणात व्हायरल पण झाले आहेत.
सोलापूरमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रवाशांकडून चिरीमिरी घेत असताना दोन ट्राफिक पोलीस कॅमेरामध्ये कैद झाली आहेत. पोलीस चिरीमिरी घेत असतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला आहे. व्हिडिओची सत्यता तपासून संबंधित जे कोणी असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
सोलापूर शहरामध्ये वाहतुकीचे आधीच तीन तेरा वाजले आहेत. शहरातील ट्राफिक विभाग वाहतुकीबाबत कोणतेही धोरण राबवत नाही. शहरातील प्रत्येक चौकात ट्राफिक पोलीस वाहतूकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करत असतात. अनेकदा लोक नियमाप्रमाणे दंड भरण्याऐवजी चिरीमिरी देऊन सुटण्याचा प्रयत्न करतात. असाच प्रकार व्हायरल व्हिडिओमध्ये पाहायला मिळाला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात एका वाहन चालकाला तिथे उपस्थित असलेल्या दोन ट्राफिक पोलिसांनी थांबविले.
नियमांचा भंग केल्याप्रकरणी चलनाची माहिती दिली. मात्र, शेवटी चिरीमिरी घेऊन या वाहन चालकाला सोडून देण्यात आलं. आपल्याला कोणी पाहू नये यासाठी हात मागे घेत या पोलिसांनी चिरमिरीची रक्कम स्वीकारली. हा सर्व प्रकार एका व्यक्तीने आपल्या मोबाईलच्या कॅमेरात रेकॉर्ड केला. ट्राफिक पोलीस अशाप्रकारे चिरीमिरी घेत असल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
आधी वाहतुकीचे नियम मोडले तर ट्राफीक पोलीस पावती फाडायचे. त्यासाठी रोख रक्कम घेतली जायची. हे पैसे घेताना चिरीमिरी देऊन वाहनचालक मोठ्या दंडातून सुटका करुन घ्यायचे. मात्र, यामुळे मोठा भ्रष्टाचार होत होता. हा भ्रष्टाचार थांबवण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वाहतूक विभागात मोठे बदल केले आणि वाहतूक विभागाचा कारभार ऑनलाईन झाला. मग डिजीटल स्वरुपात ग्राहकाच्या घरी पावती जायला लागली, पैसेही थेट वाहतूक विभागाच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली. मात्र अजूनही ट्राफिक विभागातील काहीजण चिरीमिरी घेत असल्याचं समोर येत आहे.