API मोरे व वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली चोरांच्या विरोधात दबंग कारवाई.
पारध पोलीस स्टेशन हद्दीतील गावामध्ये चोरट्यांनी पंधरा-वीस दिवसापासून धुमाकूळ घातला होता. त्याच पार्श्वभूमीवर विविध गावातून चोरांच्या विरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने एपीआय श्री अभिजीतजी मोरे व वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पारध पोलिसांनी चोरांना पडण्यासाठी एक विशेष पथक नेमणूक खबर्यामार्फत चोरांची माहिती घेत असतानाच त्यांना योग्य अशी माहिती मिळाली.
त्यानुसार पारध पोलिसांनी पथक नेमून खबर्यामार्फत माहितीनुसार तपासाची चक्रे फिरवली त्यानुसार त्यांना चोर पकडण्यात येस आले. आरोपी न 1) बाबासाहेब कोल्हापूरिया शिंदे. वय 24 वर्ष रा. विरगाव तांडा जिल्हा जालना. 2) पांडु गंगाराम पवार वय 35 वर्ष रा. मंगळूर तालुका घनसावंगी. 3) संजय ताराचंद राठोड वय 38 वर्ष 4) मुरलीधर शंकर राठोड 56 वर्ष दोघे राहणार विरेगाव तांडा जिल्हा जालना 5) रामा अण्णा पवार 28 वर्ष राहणार पुखराज नगर तालुका भोकरदन जिल्हा जालना. यांना अटक करून न्यायालयात हजर करून पोलीस कस्टडी काढण्यात आली.
वरील आरोपी विरुद्ध गुन्हा रजिस्टर करण्यात आला. असून पारध पोलीस स्टेशन येथे चोरट्यावर गुन्हे दाखल करण्यात आले गु न / 61/ 2023 कलम 557,380,511, भा द वी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या ताब्यातून आतापर्यंत 38 हजार 700 रुपये हस्तगत करण्यात यश आले आहे त्यामधील काही आरोपी फरार असून त्यांना लवकरात लवकर ताब्यात घेण्यात येतील असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे. व त्यांच्या कडून रक्कम सुद्धा हस्तगत करू असे सांगितले आहे.
फिर्यादी हरिभाऊ सुरडकर यांच्या तक्रारीवरून पोलीस ठाणे येथे चोरट्या विरोधात गुन्हा नोंद केला होता. त्यावेळी त्यांनी सांगितले की 70 हजार रुपयांच्या दोन ते चार ठिकाणी अनवा पाडा येथे चोऱ्या करून चोरट्यांनी चोरी केल्याची तक्रार दाखल केली होती . याची तात्परतेने दखल घेत एपीआय श्री अभिजीत जी मोरे व वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आणवा जमादार भारत चौधरी. पोलीस कॉन्स्टेबल श्री नागरे . पोलीस कॉन्स्टेबल श्री टेकाळे हे पुढील तपास करीत असून लवकरात लवकर आठ पैकी पाच आरोपी ताब्यात घेण्यात यश मिळाले असून पुढील तीन आरोपींना लवकरात लवकर त्यांचा शोध लावून त्यांना सुद्धा अटक करू असे सांगितले आहे.