वसुंधरा कला परिवार व मलबार गोल्ड अँड डायमंड यांच्या वतीने शेतकरी दिनानिमित्त शेतकऱ्यांचा सन्मान

पुणे प्रतिनिधी मंगेश गांधी
शेतकरी दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शेतकऱ्यांचा सत्कार-
राष्ट्रवादी काँग्रेस महिला उपाध्यक्षा योगिता गोसावी यांनी वसुंधरा कला परिवार व मलबार गोल्ड अँड डायमंड यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी दिनानिमित्त शेतकऱ्यांचा सत्कार करून सन्मानित केले. मानवाच्या मूलभूत गरजा अन्न, वस्त्र व निवारा या तीन आहेत यापैकी वस्त्र व निवारा या तीन गरजा पुरविणारे अतिशय श्रीमंत आहेत.
परंतु जगाचा पोशिंदा सर्वांना अन्न पुरविणारा आपला बळीराजा मात्र अजूनही गरीब आहे. भारत हा शेतीप्रधान देश असूनही शेतकऱ्यांची अशी वाईट परिस्थिती आहे. या शेतकरी दिनानिमित्त मी सर्वांना हेच सांगू इच्छिते की “बळीराजा शेतात काबाडकष्ट करून धान्य पिकवतात त्यामुळे पोटात मावेल तेवढेच पानात घ्या”. राष्ट्रवादी काँग्रेस महिला शहराध्यक्षा मृणालिनी ताई वाणी व मलबार गोल्ड अँड डायमंडच्या दीक्षा देसाई मॅडम यांच्या हस्ते वडकीचे माजी सरपंच श्री बापू मोडक, चंद्रकांत देवकर, गणेश खुटवड, शितल लडकत व अभिजित लडकत या शेतकऱ्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
मृणालिनी ताई वाणी यांनी शेतकऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करून सर्वांचे आभार मानले. प्रथमच आमचा असा शेतकरी दिनानिमित्त आम्हा शेतकऱ्यांचा सत्कार होत आहे याचा अभिमान वाटतो असे उदगार बापू मोडक यांनी व्यक्त केले. शेतकऱ्यांसोबत घरगुती व्यवसाय करणाऱ्या महिलांचा पण सत्कार करण्यात आला. अंजली चव्हाण, अजय जोशी, ललिता सातपुते, प्रियंका धर्मट्टी, देवयानी साळुंखे यांनी अप्रतिम गाणी सादर केली तसेच वीर उबाळे, अवधुत लिमये, प्रज्ञेश गोसावी, आरव बनसोडे, आर्वी बनसोडे, आराध्या मोरे, आर्या काळे व सई काळे या बालकलाकारांनी नृत्य व गायन सादर करून कार्यक्रम अजूनच बहारदार केला. या कार्यक्रमाचे आयोजन वसुंधरा कला परिवाराच्या अध्यक्षा योगिता गोसावी यांनी केले होते.