Viral : एकदा रेल्वे कर्मचाऱ्याने वाचवले प्राण; बाटली घ्यायला पुन्हा गेली आणि तेवढ्यात हायस्पीड ट्रेन आली.
तुम्हाला थरकाप आणणारी ही बातमी आहे, कारण समोरून जर हाय स्पीड ट्रेन येत असेल. या ट्रेनच्या खाली जर एखादा व्यक्ती आला तर तिचं काय होऊ शकतं याची कल्पनाही आपल्याला करू वाटणार नाही , मात्र या व्हिडिओमध्ये असंच धक्कादायक काही घडताना दिसत आहे.
त्या ठिकाणी रेल्वे कर्मचारी आले म्हणून ती महिला वाचली अन्यथा त्या महिलेचा चेंदामेंदा झाला असता. ही महिला रेल्वे स्थानकावरती रुळ ओलांडत होती, दरम्यान एक हाय स्पीड ट्रेन येत होती, हे या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे या रेल्वे कर्मचाऱ्यान तातडीने या महिलेला त्या रुळावरनं प्लॅटफॉर्म वरती ओढलं, त्यामुळे या महिलेचे प्राण वाचले. पुढच्या क्षणी तुम्ही बघत असाल सुसाट धावणारी हाय स्पीड ट्रेन त्या ठिकाणी आली.
मात्र ही महिला पुन्हा एकदा ट्रेनच्या जवळ गेली, कारण त्या महिलेची पाण्याची बाटली राहिली होती. हे पाहून तुमचाही राग आणावर होईल कारण या रेल्वे कर्मचाऱ्यान त्या महिलेचे जीव वाचवले, मात्र या महिलेचा जीव त्या पाण्याच्या बाटलीत अडकला होता. खऱ्या अर्थानं आपण जेव्हा रेल्वेच्या स्थानकावर असतो तेव्हा अशा प्रकारे कुठलेही कृत्य करणं चुकीचं आहे. कारण ते आपल्याही जीवावर बेतू शकत, तसेच दुसऱ्याच्याही जीवावर बेतू शकत. त्यामुळे प्रवास करताना सावधान राहून प्रवास करावा जेणेकरून आपण आपल्या सोबत सर्वांनाच सुरक्षित ठेवू शकतो.