Viral Video: वेळ वाईट असेल तर काही घडू शकते; शॉपिंग करायला गेलेल्या व्यक्तीसोबत पहा हे काय घडले.
हृदयविकाराचा झटका कधी कोणाला आणि कुठे येईल याचा काही नेम नसतो तसेच अगदी तरुणांपासून वयस्करांपर्यंत कोणालाही हृदय विकाराचा झटका येऊ शकतो अशा अनेक गोष्टी आपल्या निदर्शनास आलेल्या असतील. कधी कधी लोकांना नाचताना, चालता बोलता हृदय विकाराचा झटका आलेला आहे. आणि त्यामुळे आपला जीव देखील गमवावा लागला आहे. अशा वेळेस सर्वात उपयुक्त असते ते म्हणजे सी पी आर यामध्ये ज्यांना हृदयविकाराचा झटका आला आहे अशा लोकांचे प्राण त्वरित मदत देऊन वाचवले जाऊ शकते अशीच एक घटना एका शॉपिंग मॉलमध्ये एका व्यक्तीसोबत घडली होती.
हा व्हिडिओ पाहिला असता यामध्ये एका शॉपिंग सेंटर मध्ये एका व्यक्तीला अचानक हृदयविकाराचा झटका येऊन तो बेशुद्ध पडला पण त्या व्यक्तीचे नशीब चांगले म्हणून त्याचवेळी त्याच्या शेजारी एक डॉक्टर ही खरेदी करत होते या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आलेला पाहून त्यांनी लगेचच सी पी आर देऊन त्या व्यक्तीचा जीव वाचवला आहे.
सदरील घटना मॉलमध्ये घडलेली आहे एका व्यक्तीला अचानक हृदयविकाराचा झटका येतो आणि तो जमिनीवर कोसळतो आणि बेशुद्ध होतो हा व्यक्ती बराच वेळ होऊनही शुद्धीवर येत नव्हता यानंतर गोंधळ उडालेला पाहून शेजारीच खरेदी करत असलेल्या त्या डॉक्टरने लगेच या ठिकाणी धाव घेतली आणि लगेचच हृदयविकाराचा झटका आलेल्या व्यक्तीला सीपीआर देण्यास सुरुवात केली जवळपास दहा मिनिटे सीपीआर देत राहिले आणि त्यानंतर बऱ्याच वेळाने व भरपूर मेहनती नंतर हार्ट अटॅक आलेल्या त्या व्यक्तीचे डोळे उघडले हे पाहून सगळ्यांच्या जीवात जीव आला डॉक्टरने वेळेवर त्या व्यक्तीला मदत करून त्याचा जीव वाचवला.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड होताच मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल झाला या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असं लिहिला आहे की, ” माझ्या वडिलांनी एक जीव वाचवला आहे. एका व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याची नाडी थांबली होती. वडिलांनी दहा मिनिट पेक्षा जास्त प्रयत्न केले आणि त्या व्यक्तीला शुद्धीवर आणलं हा व्यक्ती भाग्यवान होता की एक प्रशिक्षित ऑर्थोपेडिक सर्जन खरेदी करत होता. “
आजकाल अशा घटना भरपूर प्रमाणामध्ये घडताना दिसतात अशा प्रकारच्या हृदयविकाराने बऱ्याच जणांचा जीव गेला आहे तर काहींचा वाचला देखील आहे यामध्ये वाचणाऱ्यामध्ये ज्यांना सीपीआर लगेच मिळतो ते यामध्ये वाचले आहेत. सदरचा व्हिडिओ ट्विटर अकाऊंट @rohitdak वरुन शेअर केला गेला आहे.