Viral Video : साडी सेलमध्ये ” एक साडी दोन महिलांना आवडली ” आणि पुढे WWE हाणामारी सुरु झाली.
आपल्या सगळ्यांना माहीतच असेल की महिलांसाठी साडी हा फार जिव्हाळ्याचा विषय असतो. आणि जर कुठे साडीचा सेल लागला असेल तर मग काही विचारायला नको. महिलांच्या डोळ्यांमध्ये हा सेल पाहून एक वेगळीच चमक पाहायला मिळते. बऱ्याच वेळेस आपण हेही पाहिलं असेल की एक साडी घेण्यासाठी महिला कित्येक वेळेस कोणत्याही थराला जाते.
असाच एक प्रकारचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होत आहे महिला दोन आणि साडी एक असा विषय असताना काय परिस्थिती घडली असेल याची कल्पना तुम्ही करू शकतात आणि महत्त्वाचा विषय म्हणजे तशीच साडी दुकानदाराकडे नसणे. दोघीही म्हणत होत्या की साडी मलाच पाहिजे आणि त्यासाठी त्या भांडण करू लागल्या हे भांडण पुढे जाऊन हाणामारी पर्यंत देखील गेले.
ही हाणामारी पाहताना तुम्हाला वाटेल की जणू wwe खेळाडू चॅम्पियनशिप बेल्ट साठी जसे एकमेकांवर तुटून पडतात तसेच या महिला अक्षरशा एकमेकींवर तुटून पडल्या होत्या जणू काही त्यांनी असं ठरवलं होतं की या साडीसाठी वाटेल ते.
ही घटना कुठे घडली हे ठिकाण नक्की माहित नाही पण ज्या ठिकाणी हा साडीच असेल लागला होता त्या सेलमध्ये महागड्या साड्या या कमी दरामध्ये मिळत असल्यामुळे त्या ठिकाणी महिलांनी एकच गर्दी केली होती. पण याच दरम्यान एक साडी दोन महिलांना आवडली आणि झालं असं की दुकानदाराकडे तशीच दिसणारी दुसरी साडी सुद्धा नव्हती. आणि त्यातच या दोघीही या साडीसाठी माघार घ्यायला तयार नव्हत्या आणि अखेर जे व्हायचं होतं तेच घडलं.
आधी या दोघींमध्ये या साडीसाठी शाब्दिक चकमक झाली, पुढे जाऊन या शाब्दिक चकमकीच रूपांतर हाणामारी मध्ये झालं. या हाणामारीमध्ये दोघी एकमेकींच्या झिंज्या उपटत होत्या त्याचप्रमाणे अश्लील भाषेमध्ये शिवीगाळदेखील करत होत्या. त्या इथेच थांबल्या नाहीत तर त्यांनी एकमेकींना लाथा बुक्क्यांनी देखील मारले. बरं जे लोक भांडण सोडवायला गेले त्यांनी देखील या दोघींचा थोडाफार का होईना प्रसाद खाल्ला त्यामुळे नंतर ही हाणामारी सोडवायला कोणीच पुढे आलं नाही. हा वाद बराच वेळ सुरू होता नंतर यामध्ये पोलिसांनी मध्यस्थी करून हे भांडण मिटून टाकलं.