बटाटा, पनीर किंवा चिकन नाही, तर या तरुणाने भाजून खाल्ला असा पदार्थ, Video पाहून तुम्हाला येईल उल्टी.
लोक कधी काय करतील याचा काही नेम नसतो. सोशल मीडियाच्या काळात कधी काय व्हायरल होईल याचा भरोसा नाही. आपण सोशल मीडियावर बऱ्याचदा पाहिले असेल की ज्या गोष्टींची आपण कल्पना देखील करू शकत नाही असं कल्पना शक्तीच्या पलीकडे बऱ्याचशा गोष्टी घडत असतात. आणि असाच काहीसा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे आणि आज काल तो सगळीकडे चर्चेचा विषय बनत आहे.
आज पर्यंत तुम्ही लोकांनी पनीर, बटाटं, चिकन, बोंबील रोस्ट करून खाताना पाहिलं असेल किंवा खाल्लं असेल पण त्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये या व्यक्तीने असा काही पदार्थ खाल्ला आहे की, तो व्हिडिओ पाहून तुम्हाला अक्षरशा उलटी येईल.
सदर व्हिडिओ हा इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहिले तर एका व्यक्तीने चक्क सरड्याचे भजी बनवताना दाखवला आहे.
मांसमध्ये कोंबडी, मासे किंवा बकऱ्यांपासून बनवलेले पदार्थ खाणे हे सर्व सामान्य आहे. परंतु सरड्याला भाजून खाणे हा एक प्रकारचा किळसवाणा अनुभव असू शकतो. परंतु काही नेटकरी आवडीने हा व्हिडिओ पाहत आहेत. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती काही सरड्यांना आगीत भाजून घेतो आणि त्यानंतर त्यांची त्वचा काढून टाकतो. त्वचा काढून झाल्यानंतर तो चुलीवर ठेवून त्या सरड्यांना छान पैकी तळतो त्यामध्ये मीठ आणि मसालेही टाकतो.
नीट शिजल्यावर तो आरामात बसून खाताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर असे दिसते की, त्याला तो पदार्थ खूप चवदार लागला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक लोकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट केल्या आहेत. यामध्ये लोकांची आवड काय असेल आपण अंदाज लावू शकत नाही असे दिसते.