Viral Video : उत्साहात नाचणाऱ्या नवरीसोबत पहा हे काय घडलं.
लग्न समारंभ म्हटलं की अनेक मोठा खर्च केला जातो, आपले लग्न सगळ्यांपेक्षा हटक असावं यासाठी अनेक जण प्रयत्न करतात, असाच प्रयत्न करणाऱ्या एका वधू सोबत विचित्र प्रकार घडला. ती पूर्ण शृंगार करून मंडपात निघाली होती, तेव्हा तिला रील बनवण्याचा मोह आवरला नाही आणि यावरील तिच्यासोबत धक्कादायक असं घडलं, साज शृंगार करून निघालेली नववधू एका गाण्यावरती फिरकत होती, फिरकत असतानाच वजनदार असणारा घागरा तिला सावरला नाही आणि ती कॅमेराच्या समोरच धपकन खाली पडली त्यामुळे काही वेळ तिला देखील हसू आवरलं नाही,लग्नाचा दिवस प्रत्येकासाठी खूप खास असतो, मग ती वधू असो किंवा वर. प्रत्येकाला हा क्षण कॅमेऱ्यात कैद करायचा असतो, पण प्रत्येक गोष्ट परफेक्ट होईलच असं नाही.
आता हा व्हिडिओ तुम्हीच बघा, जिथे नववधू मेरा दिल ये पुकारे आजा गाण्यावर डान्स करत आहे. अगदी आनंदात ती या गाण्यावर डान्स करत आहे.या गाण्यावर तुम्ही शेकडो रील्स पाहिल्या असतील, पण वधूचा हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला खळखळून हसवेल. व्हिडिओमध्ये लेहेंगा घातलेली एक सुंदर नववधू व्हिडिओ शूट करताना दिसत आहे. त्याचवेळी तिच्यासोबत नको ते घडतं. जे पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. हा व्हिडिओ इतका व्हायरल होत आहे की, ही बातमी लिहिपर्यंत 60 लाखांहून अधिक लोकांनी तो पाहिला आहे.
मात्र, इतक्यात आपल्या हेवी लेहंग्यामुळे ती धाडकन खाली कोसळते. नवरी खाली पडताच व्हिडिओ शूट करणारा व्यक्ती तिला उचलण्यासाठी येतो. हा संपूर्ण प्रकार इतका मजेशीर वाटतो, की नवरी स्वतःही हसू लागते.तुम्हाला पाकिस्तानी व्हायरल गर्ल आयशाबद्दल माहिती असेलच. एक गाणं आणि तिच्या डान्स स्टेप्सने तिला जगभरात प्रसिद्ध केलं. आता त्या गाण्याची क्रेझ इतकी आहे की सगळ्यांनी त्यावर रिल्स बनवायला सुरुवात केली.
पण सध्या एका वधूचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती मंडपात जाण्यापूर्वी या गाण्यावर व्हिडिओ शूट करत आहे, यादरम्यान तिच्यासोबत असं काही घडतं, जे पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही.