काय ते नशीब ! भाजपच्या एका खासदारासाठी दोन बायकांनी ठेवलं व्रत, एकत्रच पूर्ण केला करवा चौथ.
एखाद्यचे काय नशीब असू शकते याचा अंदाज तुम्हाला या बातमीमध्ये येऊन जाईलच. आजच्या काळात इथे एक लग्न होईल कि नाही याची चिंता असते पण जर तुम्हाला २-२ बातम्या मिळाल्या तर ? हो तुम्ही म्हणाल कि इथे एकच होत नाही तर २ कुठून आणणार पण या बातमी मधील खासदार आहेत यांना चक्क २ बायका आहेत. आणि यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे या दोघीही सोबत राहतात.
ही बातमी उदयपूरचे भाजप खासदार अर्जुनलाल मीणा यांच्या बद्दलची आहे. यांना दोन पत्नी आहेत. दोघीही एकाच घरात एकत्र राहतात. या दोघींनीही करवा चौथच्या निमित्ताने एकत्र उपवास करत अर्जुनलाल मीणा यांची पूजा केली. त्याचप्रमाणे या दोघींनी एकत्र पाणी पिऊन उपवास सोडला.
भाजप खासदार अर्जुनलाल मीणा यांच्या दोन्ही पत्नी अनेक वर्षांपासून आपल्या पतींसाठी करवा चौथचं व्रत करतात. करवा चौथच्या निमित्ताने दोघींनी कथा ऐकली आणि चंद्र आल्यावर पती खासदार मीणा यांना पारंपारिक पद्धतीने टीळा लावून, मिठाई भरवत, आरती करुन दोघींनी एकत्रच चंद्र आणि मीणा यांना चाळणीतून पाहिलं. अर्जुनलाल मीणा हे म्हणतात की, ते खूप दिवसांपासून आजारी होते, पण आता ते बरे झाले आहेत. दोन्ही पत्नींच्या व्रतामुळेच बरे होऊ शकल्याचंही त्यांनी या ठिकाणी सांगितले आहे.. याआधी ते अनेक दिवस दिल्लीतील रुग्णालयात दाखल होते.
खासदार अर्जुनलाल मीणा यांनी दोन सख्ख्या बहिणींशी लग्न केलं आहे. मीणा यांनी सख्ख्या बहिणींशी लग्न केल्यामुळे या दोघींमध्ये दुरावा नाही. खासदार अर्जुनलाल मीणा यांच्या एका पत्नीचं नाव राजकुमारी असून ती व्यवसायाने शिक्षिका आहे. दुसऱ्या पत्नीचं नाव मीनाक्षी आहे. ती एका गॅस एजेन्सीची मालकीण आहे. या दोघी सख्ख्या बहिणी असल्याने त्या मागील कित्येक वर्षांपासून एकाच घरात आनंदाने राहत आहेत. आदिवासी भागात पुरुष एकाहून अधिक महिलांशी लग्न करू शकतात अशी परंपरा आहे.
अर्जुनलाल मीणा हे राजस्थानमधील २५ खासदारांपैकी एक आहेत. २०१४ च्या मोदी लाटेत ते खासदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा उदयपूरच्या जनतेने मीणा यांना संसदेत निवडून दिलं. पण या सगळ्यात चक्क दोघी सख्या बहिणी एकाच नवऱ्यासोबत गेले कित्येक वर्षापासून संसार करत आहेत. आणि कोजागिरी निमित्त या दोघींनी उपवास सोडताना सोबत उपवास सोडला आहे.