काय सांगता ? ७६ वर्षाच्या आजोबांनी केला चक्क हा विक्रम, मिळवला पहिला क्रमांक.
बऱ्याच वेळा आपण पाहतो की, वयाची चाळीशी उलटल्यानंतर आपल्याला अनेक प्रकारचे आजार चढतात. आणि त्यानंतरचा प्रवास हा डॉक्टर, दवाखाने, गोळ्या, औषध हे सगळं करण्यातच जातो. पण ही बातमी थोडीशी वेगळी आहे. या बातमी मधील आजोबा एक स्पर्धा जिंकली आहेत. आणि या आजोबांच वय 76 वर्ष आहे. आज त्यांचे एवढे वय असताना देखील ते एखाद्या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतात, याचा विश्वास लवकर कोणाला बसणार नाही.
पण हो तसं घडलं आहे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व संस्थेच्या वर्धापन निमित्त एचबीएच रिटायर्ड एम्प्लॉईज वेल्फेअर प्रतिष्ठान तर्फे ज्येष्ठ नागरिकांच्या चालण्याच्या स्पर्धा आयोजित केल्या गेल्या होत्या. आणि या स्पर्धेमध्ये जवळपास 80 ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग नोंदवला होता. या सगळ्यांमध्ये एका 75 वर्षाचे पद्माकर कुलकर्णी स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक मिळवला आहे. शाळेत ज्याप्रमाणे एखादं मूल जिंकल्यानंतर त्याला जो आनंद होतो, त्याचप्रमाणे या आजोबांना देखील आनंद झाला आहे. सदरील स्पर्धेसाठी पुरुषांच्या बरोबर महिला वर्ग व 83 वर्षाच्या आजोबांचा सहभाग हा सगळ्यांचे लक्ष वेधून घेणारा ठरला.
या प्रतिष्ठान तर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व संस्थेचा वर्धापन दिन चे अवचित्त साधून या प्रतिष्ठानने ही स्पर्धा घेतली होती. ही स्पर्धा अमरप्रीत चौकात आयोजित करण्यात आली होती. सदरच्या स्पर्धेमध्ये निवृत्त असलेले असे 80 जेष्ठ लोकांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेला सुरुवात करण्यासाठी संस्था अध्यक्ष प्रल्हाद बडवे यांनी हिरवी झेंडी दाखवली. प्रत्येक सहभागी स्पर्धकांनी तीन किलोमीटरचे अंतर पार केले. यामध्ये 76 वर्षाचे पद्माकर कुलकर्णी, 68 वर्षांचे मनोहर वाकपंजर, 63 वर्षांचे अजय कोटणीस, 73 वर्षांचे काशीनाथ खरात, 62 वर्षांचे अभयसिंग पवार, अतुल कुलकर्णी यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
ज्यावेळी स्पर्धेत विजयी झालेल्या सभासदांना त्यांची प्रतिक्रिया विचारली त्यावेळेस ते म्हणतात कि, ” लहान मुलांना ज्या पद्धतीने जिंकल्यानंतर आनंद होतो, अगदी त्याचप्रमाणे आम्हाला देखील आनंद झाला आहे आणि तो विजयाचा आनंद आम्ही कशातही मोजून दाखवू शकत नाही.” असं त्यांनी सांगितलं.
अगदी लहानपणापासून ते आत्तापर्यंत कोणत्याही स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक मिळवता आला नाही, पण या उतरत्या वयामध्ये पहिला क्रमांक आला आहे. आणि त्यामुळेच खूप वेगळा असा आनंद झाला आहे. त्याचप्रमाणे घरातील सदस्य व ओळखीच्या लोकांकडून शुभेच्छांचा वर्षाव देखील होत आहे. अशाही प्रतिक्रिया विजयी सभासदांनी दिली दिल्या.
या स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या सभासदांचे संस्थेतर्फे आभार व्यक्त करण्यात आले. त्याचप्रमाणे जे विजेते ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम हा 15 ऑगस्ट रोजी होणार आहे. या बक्षीसामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने त्यांना उपयोगी असणाऱ्या किंवा त्यांच्या गरजेचे असणारे बक्षीस त्यांना देण्यात येणार आहे असे यावेळी सांगण्यात आले.