माझ्या बायकोशी का बोलला..? म्हणून त्याने उचलले असे पाऊल.
समाजात अनेक घटना घडतात. काही नैतिक असतात तर काही अनैतिक असतात. मात्र अनुचित अशा घटनांमुळे समाज ढवळून निघतात. बऱ्याचदा यामुळे समाजावरती विपरीत असे परिणाम होतात. काही घटनांमुळे आपलं मन देखील सुन्न होतं. काही घटनांमुळे आपला संताप देखील आणावर होतं. पती-पत्नीचा वाद हा काही अनोखा नाहीये. घरोघरी मातीच्या चुली असं म्हटलं जातं आणि घरात भांड्याला भांड लागतं असंही म्हणतात.
भांड्याला भांड लागणार म्हणजेच पती-पत्नीमध्ये काही ना काही कारणावरून वाद होणं हे वाद किरकोळ असतील तर ठीक आहे मात्र या वादाचे रूपांतर मोठ्या एखाद्या कुठल्या घटनेत झालं तर तो संसार उघडा वरती पडतो. आणि त्यानंतर पूर्णपणे आपल्या आयुष्याची तडी दिसत. कधीकधी पती-पत्नीच्या वादाचं कारण हे संबंध देखील असतात. कधी पतीचे अनैतिक संबंध असतात, कधी पत्नीचे ही बाहेर नाही ती संबंध असतात. अशा घटना आपण पहात असाल वारंवार घडतात आणि अशा घटनांमुळेच काही संसार उघडा वरती पडतायेत.
यामध्ये आपली जी बालक असतील त्यांचा मोठा प्रश्न निर्माण होतो त्यांच्यावरती अन्याय होतो अशीच एक घटना महाराष्ट्रातील आहे अक्षरशा खळबळ उडवणारी घटना आहे ती म्हणजे धुळे जिल्ह्यातून ही घटना समोर येते. सदरील घटनेतील व्यक्तीला स्वताच्या बायकोवर संशय असतो, आणि त्याच्या मनात त्याबाबतीत राग असतो तो पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून मोसिन शेख या तरुणाला कुराडीन वार करत गंभीर जखमी केले. हि घटना देवपूर बस स्थानक परिसरात घडली.
देवपूर पोलिसांनी या घटनेच्या अंतर्गत दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत या घटनेची सखोल माहिती या पद्धतीने आहे, जखमी व्यक्ती मोसिन शेख यांना पोलिसात फिर्यादी होती ही फिर्यादाने गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास दिली अरबाज सलीम शेख आणि सलीम शेख या दोन जणांना अडवून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. आणि त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मोसिन शेख हा सलीम यांच्या पत्नीशी बोलतो या रागातून हा हल्ला झाल्या असल्याचं फिर्यादी त्यांनी म्हटलं आहे ‘माझ्या बायकोशी बोलतो का रे? असं म्हणत या तरुणाला त्यांनी गाठलं आणि त्यानंतर त्याला बेदम मारहाण केली आणि या मध्ये तो जखमी होतो.
कोणत्याही प्रकारचा ठोस पुरावा नसताना अशा प्रकारचा प्रकारचे पाऊल उचलने नक्कीच घटक ठरू शकते, बायकोबाबत प्रेम असणे ठीक आहे पण त्याच बायकोवर संशय घेण पण चुकीचे आहे. ती आपले आई वडिलांचे घर सोडून नवऱ्याकडे येत असते. नवरा हाची तिचा पालक असतो त्यामुळे ती त्याच्यावर जिवापाड प्रेम करत असते आणि स्वतः पेक्षा जास्त विश्वास ठेवत असते पण जेव्हा तिचा पती असा वागतो तेव्हा नक्कीच ती मनातून तुटत असते. ज्यावर आपण स्वतः पेक्षा जास्त विश्वास ठेवतो आपल्या चारित्र्यावर संशय घेतो तेव्हा त्या पत्नीचा विश्वास तुटत असतो.