चिकन बनवण्यासाठी बायको नाही म्हणाली; म्हणून बेवड्याने उचलले टोकाचे पाऊल.
पती पत्नी हे एका रथाचे दोन चाक असतात , त्याचं नात हे फार वेगळ असत मात्र काही वेळा याच नात्यला काळिमा बसला जातो आणि असे कृत्य घडतात.चिकन बनवण्यास नकार दिल्यामुळे पत्नीची हत्या केली, पतीला सणादिवशी चिकन खायचं होत पण पत्नीने ते बनण्यास नकार केला तर त्या पेताड नवर्याने आपल्या पत्नीला संपवलं, पतीने लाकडी दांड्याने पत्नीच डोकं फोडल्याची धक्कादायक घटना चंद्रपूरात घडली. या घटनेत महिला गंभीररित्या जखमी झाली आहे. ही घटना जिल्हातील आरवट येथे घडली. रेखा कश्यप असं जखमी महिलेचं नाव आहे. या प्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी पती राजेश कश्यप याला अटक करण्यात आली आहे.
जिल्ह्यात धुलिवंदनाचा सन उत्साहात साजरा झाला. या दिवशी घराघरात चिकन, मटण शिजलं. अशात चिकन बनवून दिलं नाही म्हणून पत्नीला बेदम मारहाण केल्याची घटना जिल्हात आरवट येथे घडली. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हातील आरवट येथील राजेश कश्यप याने धुलिवंदनाचा दिवशी मद्य प्राशन केलं. त्याच अवस्थेत तो घरी पोहोचला. घरी आल्यानंतर त्याने पत्नीपुढे चिकन खायची इच्छा व्यक्त केली.
मात्र, सकाळचं जेवण शिजवून झालं होतं. त्यामुळे पत्नीने “रात्री चिकन बनवणार”, असं सांगितलं. पत्नीने नकार देताच राजेश संतापला.राजेशने अंगणात असलेला लाकडी दांड्याने रेखाच्या डोक्यावर वार केला. या हल्ल्यात रेखाला गंभीर जखम झाली. रक्तबंबाळ अवस्थेत रेखा जमिनीवर कोसळली. शेजारी असलेली रेखाची बहीण धावून गेली. त्यानंतर जखमी अवस्थेत रेखाला दुचाकीने जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. या प्रकरणी शहर पोलिसांनी महिलेचा पती राजेश कश्यपविरुद्ध कलम ३२६ अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
अधिक तपास पोलीस करत आहेत.रक्तबंबाळ अवस्थेत रेखा जमिनीवर कोसळली. शेजारी असलेली रेखाची बहीण धावून गेली. त्यानंतर जखमी अवस्थेत रेखाला दुचाकीने जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. या प्रकरणी शहर पोलिसांनी महिलेचा पती राजेश कश्यपविरुद्ध कलम ३२६ अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.